24.8 C
Ratnagiri
Wednesday, October 15, 2025

सागरी सुरक्षारक्षक यंत्रणा रामभरोसे, मच्छीमारांकडूनही नाराजी

सागरी किनाऱ्याची सुरक्षा ही अत्यंत संवेदनशील आणि...

परताव्याच्या प्रतीक्षेत ३६ हजार ४६८ बागायतदार…

वातावरणातील बदलांमुळे कोकणातील आंबा-काजू बागायतदारांचे होणारे ...

दापोलीत ३५ इलेक्ट्रिक वातानुकूलित बसेस

रस्त्यात बंद पडणाऱ्या जुन्या बसेस, एसीचा अभाव,...
HomeChiplunकोकणात गणेशोत्सवामध्ये धावणार स्पेशल मेमू

कोकणात गणेशोत्सवामध्ये धावणार स्पेशल मेमू

ही रेल्वे ५, ६ आणि ७ सप्टेंबरला धावणार आहेत.

कोकणात येणाऱ्या प्रवाशांसाठी गणेशोत्सवात स्पेशल मेमू सोडण्यात येणार आहे. ही रेल्वे ५, ६ आणि ७ सप्टेंबरला धावणार आहेत. गणेशोत्सवाच्या काळात नागरिकांचा प्रवास अधिक सुकर होण्यासाठी रेल्वे प्रशासनाने प्रवाशांसाठी हा निर्णय घेतला आहे. गणेशोत्सव हा कोकणातील प्रमुख सण आहे. या काळात लाखो नागरिक कोकणात येतात. अशावेळी रेल्वेचे तिकीट देखील मिळणेही मुश्कील आहे. कोकणमार्गावर होणारी गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना दिलासा दिला आहे. चिपळूण-पनवेल-चिपळूण या मार्गावर तीन दिवसांसाठी अनारक्षित मेमू विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.

या निर्णयामुळे चाकरमान्यांसह भाविकांना मोठा दिलासा आहे. तसेच लोकमान्य टिळक टर्मिनस आणि सावंतवाडी रोडदरम्यान आठ द्विसाप्ताहिक सेवांचा समावेश आहे. या रेल्वे २८ आणि ३१ ऑगस्ट, ४ आणि ७ सप्टेंबरला दोन्ही मार्गावर धावतील. एलटीटी-सावंतवाडी विशेष सकाळी ८.४५ वाजता सुटेल आणि त्याच दिवशी रात्री १०.२० वाजता पोहोचेल. परतीचा प्रवास सावंतवाडी रोडवरून रात्री ११.२० वाजता सुटून दुसऱ्या दिवशी दुपारी १२.३० वा. एलटीटी येथे पोहोचेल.

RELATED ARTICLES

Most Popular