28.9 C
Ratnagiri
Sunday, February 5, 2023

पालशेतच्या समुद्रकिनाऱ्यावर सागरी साहसी खेळांची सुविधा उपलब्ध

नवीन वर्षाचे स्वागत आणि कोकण किनारपट्टी एक...

बागायतदारांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवशीय धरणे आंदोलन

कोरोनाचे संकट, त्यानंतर चक्रीवादळ अशा नैसर्गिक दुष्टचक्रामध्ये...

नववर्षाच्या स्वागतासाठी पोलीस यंत्रणा सक्रीय

सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाचे...
HomeKokanम्हणून यांना मनापासून ‘साहेब’ म्हणावसं वाटतं… धन्यवाद राजसाहेब

म्हणून यांना मनापासून ‘साहेब’ म्हणावसं वाटतं… धन्यवाद राजसाहेब

राज ठाकरेंनी कोकण महामार्गाच्या रेंगाळलेल्या कामात विशेष लक्ष घातल्यामुळे मराठी अभिनेता अभिजीत केळकरने त्यांचे कौतुक केलं आहे.

काही दिवसांपूर्वीच मनसे पक्षाध्यक्ष राज ठाकरे कोकणच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांना मुंबई कोकण रस्त्यावरच्या दुरवस्थेचा अनुभव आला. गेली १० वर्ष या रस्त्याचे काम सुरूच असून, ते अजून काही पूर्णत्वास गेलेले नाही याबाबत त्यांनी खंत व्यक्त केली. त्यामुळेच मुंबईला परतल्यावर हे काम तातडीने पूर्ण करण्यात यावे यासाठी, राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती.

सध्याच्या राजकारणाला सर्वच वैतागले आहेत. कधी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर वाद होतोय तर कधी विरोधी  पक्षांमधील वाद चव्हाट्यावर येत आहेत. तर कधी राजकारण्यांच्या खासगी गोष्टी विरोधक समोर आणत आहेत. त्यामुळे सध्याचे वातावरण ढवळून निघाले आहे, शिवाय कोण कधी कोणत्या पक्षात जाईल आणि कोण पाठीत खंजीर खुपसेल याचा काहीच भरोसा राहिलेला नाही. अशातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने, सर्वांचेच लक्ष वेधले. यावरून बऱ्याच राजकीय चर्चा रंगल्या. पण समोर आले वेगळेच कारण.

राज ठाकरे यांनी राजकीय उद्देशाने भेट घेतल्याच्या अनेक बातम्या व्हायरल झाल्या, पण सत्य समोर आल्यावर त्यावर आपोआपच पडदा पडला. मुंबई महानगरपालिका व अन्य निवडणुका जवळ आल्याने राज ठाकरे यांनी युती करण्यासाठी ही भेट घेतली का अशा अनेक अफवा उठल्या. पण याचे खरे कारण समोर आल्यानंतर सर्वांनीच राज यांचे कौतुक केले. राज ठाकरेंनी कोकण महामार्गाच्या रेंगाळलेल्या कामात विशेष लक्ष घातल्यामुळे मराठी अभिनेता अभिजीत केळकरने त्यांचे कौतुक केलं आहे.

गेल्याच रविवारी, ११ नोव्हेंबर रोजी मुंबई-नागपूरला जोडणाऱ्या समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन करण्यात आलं होतं. त्यावेळी अभिजीतने ‘आमचं कोकणही समृद्धीची वाट बघतंय… गेली १२ वर्ष’ अशा आशयाची पोस्ट केली होती. त्यामुळे आता आशेचा किरण दिसल्याने त्याने पुन्हा एक पोस्ट लिहिली आहे. राज ठाकरेंच्या या बातमीचा फोटो अभिजीतने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केला आहे. या पोस्टला त्याने ”म्हणून यांना मनापासून ‘साहेब’ म्हणावसं वाटतं… धन्यवाद राजसाहेब” असे कॅप्शन दिले आहे. अभिजीतने राज ठाकरेंसाठी केलेली ही पोस्ट सध्या चर्चेत आहे.

RELATED ARTICLES

Most Popular