29.1 C
Ratnagiri
Sunday, February 25, 2024

बहुजनांनी ओबीसी झेंड्याखाली एकत्र यावे – चंद्रकांत बावकर

कुणबी समाजासह ओबीसी समाजाच्या विकासासाठी संघटन होण्यासह...

सहा शेतकऱ्यांना राज्यस्तरीय कृषी पुरस्कार

कृषी, कृषी संलग्न क्षेत्र फलोत्पादन क्षेत्रात उल्लेखनीय...

रत्नागिरी ‘लायन्स क्लब’च्या डायलिसिस सेंटरचा प्रारंभ

लायन्स चॅरिटेबल ट्रस्ट संचालित यशस्वी नेत्र रुग्णालयानंतर...
HomeRatnagiriराज्य सरकार एसटी कर्मचाऱ्यांना लवकरच आनंदाची बातमी देईल – मुख्यमंत्री

राज्य सरकार एसटी कर्मचाऱ्यांना लवकरच आनंदाची बातमी देईल – मुख्यमंत्री

रा. प. कर्मचाऱ्यांची वेतनवाढ ही वेतन आयोगाप्रमाणे न होता ती चुकीच्या पद्धतीने झाल्याने त्यांचे जीवनमान खालावले आहे.

रत्नागिरीतील एसटी कर्मचाऱ्यांनी कोकण दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या माध्यमातून घेऊन वेतन वाढीची मागणी केली. त्याचप्रमाणे कर्मचाऱ्यांना वेतन आयोग लागू करण्याची मागणी देखील कर्मचाऱ्यांनी केली आहे. मुख्यमंत्र्यांनी वेतन आयोग लागू करण्यासाठी राज्य सरकार सकारात्मक निर्णय घेऊन कर्मचाऱ्यांना लवकरच आनंदाची बातमी देईल, असे आश्वासन दिले.

रत्नागिरी दौऱ्यादरम्यान एसटी कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतली. त्या वेळी युवानेता अनिकेत सावंत यांनी एसटी विभागीय कार्यालयाबाहेर एसटीची आकर्षक प्रतिकृती भेट दिली. ही प्रतिकृती शिंदे यांना खूपच आवडली आणि त्यांनी सावंत यांचे तोंड भरून कौतुक केले. शासकीय विश्रामगृह येथे मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देताना सूर्यकांत साळवी, मंगेश देसाई, उदय कदम, राजेश तथा नाना मयेकर, बंटी विश्वासराव, सचिन वायंगणकर, आनंद काताळकर, अनिकेत सावंत उपस्थित होते.

मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, एसटी कर्मचाऱ्यांची वेतन निश्चिती केल्याने शासकीय कर्मचारी व रा. प. कर्मचारी यांच्या वेतनामध्ये ५, ६वा आणि ७वा वेतन आयोग देताना फार मोठी तफावत निर्माण झाली. रा. प. कर्मचाऱ्यांची वेतनवाढ ही वेतन आयोगाप्रमाणे न होता ती चुकीच्या पद्धतीने झाल्याने त्यांचे जीवनमान खालावले आहे.

एसटी कर्मचाऱ्यांच्या अभूतपूर्व संपानंतर कर्मचारी शांत राहिले होते. यानंतर राज्यात सत्तांतर झाले. संप मिटल्यानंतर पाच महिने कोणत्याही संघटना वेतनवाढ किंवा आयोग लागू करण्याबाबत बोलत नव्हत्या. यामुळे निवृत्त कर्मचारी संतोष शेट्ये, रत्नागिरी आगारातील विभागीय भांडार शाखेतील चालक मंगेश देसाई यांनी मंत्री उदय सामंत यांच्याशी वारंवार हा विषय मांडण्याकरिता बैठक बोलावण्यासाठी प्रयत्न केले. त्यानंतर पालकमंत्री तथा उद्योगमंत्री सामंत यांनी कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन मुख्यमंत्र्यांच्या भेटीचे नियोजन केले.

RELATED ARTICLES

Most Popular