24.6 C
Ratnagiri
Thursday, February 20, 2025

अपघातांमुळे कुंभार्ली घाटात वाहतूक कोंडी, वारंवार घडतात घटना

कुंभार्ली घाटातील रस्त्याची तात्पुरती दुरुस्ती करण्यात आली...

बसरा स्टार बनले ‘पर्यटन स्पॉट’, स्थानिकांना रोजगार

येथील मिऱ्या किनाऱ्यावर निसर्ग चक्रीवादळामुळे अडकून पडलेले...

सागरी क्षेत्रात अंमलबजावणी कक्ष स्थापन – मत्स्यव्यवसायमंत्री नीतेश राणे

सागरी क्षेत्रात अनधिकृतपणे परराज्यातील मासेमारी नौकांकडून होणारी...
HomeRatnagiriकोकण रेल्वे मार्गावर महाकुंभमेळ्यासाठी विशेष रेल्वे गाड्या

कोकण रेल्वे मार्गावर महाकुंभमेळ्यासाठी विशेष रेल्वे गाड्या

उडुपी ते प्रयागराज जंक्शन दरम्यान विशेष ट्रेन.

कोकणातील प्रवाशांसाठी खुशखबर – उडुपी ते प्रयागराज जंक्शन दरम्यान विशेष ट्रेन चालवण्याचा निर्णय कोकण रेल्वे ने घेतला आहे. यामध्ये गाडी क्र. ०११९२ उडुपी टुंडला जंक्शन सोमवार, १७ फेब्रुवारी २०२५ रोजी दुपारी १२:३० वाजता उडुपी येथून महाकुंभ विशेष सुटेल. ट्रेन टुंडला जंक्शनला तिसऱ्या दिवशी (बुधवार, १९ राजी) दुपारी १ वाजता पोहोचेल. गाडी क्र. ०११९१ तुंडला जं. तुंडला जंक्शन येथून उडुपी महाकुंभविशेष रवाना होईल. गुरुवार, २० रोजी सकाळी ९:३० वाजता सुटेल. ट्रेन तिसऱ्या दिवशी (शनिवार, २२ रोजी) १८:१० वाजता उडुपीला पोहोचेल.

ही गाडी बारकुर, कुंदापुरा, मुकांबिका रोड बयंदूर, भटकळ, मुर्डेश्वर, कुमटा, गोकर्ण रोड, कारवार, मडगाव जंक्शन, रत्नागिरी, चिपळूण, रोहा, पनवेल, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, भुसावळ, इटारसी, पिपरीया, मदनीक, माणिकपूर, जं. प्रयागराज जंक्शन, फतेहपूर, गोविंदपुरी आणि इटावा स्टेशनला थांबेल. गाडीला एकूण २० कोच आहेत. २ टायर एसी १ कोच, ३टायर एसी ५ कोच, स्लीपर १० कोच, जनरल २ कोच असतील. प्रवाशांनी या सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन कोकण रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी गिरीश करंदीकर यांनी केले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular