31 C
Ratnagiri
Friday, May 9, 2025

निधी अभावी काजू तारण योजना पडली बंद – कृषी उत्पन्न बाजार समिती

बदलत्या हवामानाच्या परिणामामुळे दरवर्षी काजूची उत्पादकता घटलेली...

पाईपलाईनचे काम अखेर सुरू, शीळ धरण ते जॅकवेल परिसर

शीळ धरण कालवा ते जॅकवेलपर्यंतची " सुमारे...

जिल्हाभरात दुसऱ्या दिवशीही पावसाची हजेरी, नागरिकांची तारांबळ

सलग दुसऱ्या दिवशी सकाळीच पडलेल्या पावसाने जिल्हावासीयांना...
HomeRatnagiriरत्नागिरीत भरधाव मोटारची ३ वाहनांना धडक

रत्नागिरीत भरधाव मोटारची ३ वाहनांना धडक

या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

शहरातील जयस्तंभ येथे एका भरधाव चारचाकी मोटारीने तीन वाहनांना धडक दिली. यामध्ये एक महिला जखमी झाली आहे. अपघात झाल्यावर तेथून धडक देणाऱ्यानी पोबारा केला. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात सांगलीतील गाडी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्रीधर माणिक पाटील (रा. सुरूल, ता. वाळवा, जि. सांगली) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित चालकाचे नाव असल्याचे पोलिसांनी पत्रकारांना माहिती देताना सांगितले. साईराज राजकुमार शर्मा (वय २४, रा. आजगावकरवाडी जयस्तंभ) यांनी याबाबतची तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी दिलेली माहिती अशी, गुरुवारी सायंकाळी ७.१५ वाजता शर्मा हे मित्र अनिल राठोड (रा. जयस्तंभ) यांच्यासोबत पालिकेसमोर उभे होते.

एवढ्यात लाल रंगाच्या गाडीच्या चालकाने गाडी जेलनाका ते चवंडे वठार, अशी रस्त्याची विशिष्ट परिस्थिती लक्षात न घेता चालवून शर्मा यांच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात त्यांची आई सारीका शर्मा यांच्या पायाला दुखापत झाली. दुचाकीला धडक दिल्यावरही भरधाव वेगात गाडी चालवून काळ्या रंगाची जीप आणि पांढऱ्या रंगाच्या गाडीला ठोकर दिली. या अपघातात एक महिला जखमी झाली आहे असे पोलिसांनी सांगितले. अपघातानंतर चालकाने पलायन केले आहे. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याचा तपास सहायक पोलिस उपनिरीक्षक साळुंखे करत आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular