28.7 C
Ratnagiri
Sunday, November 23, 2025

रेशन दुकानदारांची दिवाळी ‘कडू’, पालकमंत्र्यांना निवेदन देणार

जिल्ह्यातील रेशन दुकानदारांचे जुलै महिन्यापासून थकलेले कमिशन...

४४ कोटींच्या डांबर खरेदीत अनियमितता – बाळ माने

रत्नागिरी पालिकेत २०१४ ते २३ या कालावधीत...

खेर्डी-टेरव मार्ग होणार खड्डेमुक्त, बांधकाम विभागाचे आश्वासन

पुढील पंधरा दिवसांत खेर्डी-टेरव रस्त्यावरील सर्व खड्डे...
HomeSindhudurgभरधाव वेगाने दुचाकी चालवणाऱ्या दुचाकीस्वाराचे अखेर निधन

भरधाव वेगाने दुचाकी चालवणाऱ्या दुचाकीस्वाराचे अखेर निधन

भरधाव वेगाने जाणार्‍या दुचाकीवरील ताबा सुटून झालेल्या अपघातात गंभीर जखमी

सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये वाहनांच्या अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढले आहे. वाहनाच्या बेदरकारपणे चालवण्याने अनेक वेळा भीषण अपघात घडतात आणि जीवितहानी देखील होण्याचे प्रमाण वाढले आहे. अनेक वेळा दुचाकीस्वार एवढया भन्नाट वेगाने गाडी हाकतात कि, त्यावरील ताबा सुटून पादचारी अथवा इतर वाहनांना देखील अपघात झाल्याने नुकसान पोहोचते.

भरधाव वेगाने जाणार्‍या दुचाकीवरील ताबा सुटून झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचा गुरुवारी सकाळी १० च्या सुमारास उपचारादरम्यान मृत्यू झाला. नियाज सिराज वय ३८, रा. आजरा असे त्या मयत दुचाकीस्वराचे नाव आहे. ही घटना २९ मे रोजी माडखोल फुगेवाडी येथे घडली होती गंभीर जखमी दुचाकीस्वारावर गोवा बांबोळी येथे उपचार सुरू होते.

संबंधित दुचाकीचालक आपल्या ताब्यातील गाडी घेऊन २९ मे च्या रात्री आंबोलीहून सावंतवाडीच्या दिशेने जात होता. यावेळी माडखोल-फुगेवाडी परिसरात तो आला असता त्याचा दुचाकीवरील ताबा सुटला व दुचाकी उडून रस्त्याच्या शेजारी दुकानाकडे उभ्या असलेल्या महिलेवर आदळली. यात चालकासह त्या महिलेला दुखापत झाली. दरम्यान, संबंधित महिलेला कुडाळ रुग्णालयात हलविण्यात आले तर गंभीर जखमी दुचाकीचालकाला थेट ओरोस रुग्णालयात दाखल करत अधिक उपचारासाठी बांबोळी येथे हलवण्यात आले गेले चार दिवस त्याच्यावर उपचार सुरू होते परंतु, आज सकाळी त्याची प्राणज्योत मालवली. सुरुवातील उपचाराना त्याने साथ दिली मात्र, त्यानंतर परिस्थिती अजून गंभीर बनत गेली. त्यामुळे वाहन चालवताना घेण्यात येणारी काळजी प्रत्येकाने स्वत:च्या आणि इतरांच्या देखील बाबतीत घेण्याची गरज आहे. जेणेकरून स्वत: बरोबर दुसर्यांचा जीव देखील वाचू शकतो.

RELATED ARTICLES

Most Popular