24.4 C
Ratnagiri
Wednesday, November 13, 2024

हरचिरी-उमरेत पकडली ७६ वानर-माकडे , आंबा बागायतदारांना दिलासा

गेल्या महिन्यात सुमारे ७० वानर माकडे पकडण्यात...

चिपळूणचे मटण, मच्छीमार्केट १८ वर्षे बंद

चिपळूण शहरातील मटण आणि मच्छीविक्रीचा प्रश्न गंभीर...

कोयना धरणातून यंदा उन्हाळ्यात पुरेशी वीजनिर्मिती

कोयना धरणातून यावर्षी पावसाळ्यात १८ टीएमसी पाणी...
HomeMaharashtraमुख्यमंत्र्यांची प्रकृती स्थिर, सध्या फिजिओथेरपीची प्रक्रिया सुरू

मुख्यमंत्र्यांची प्रकृती स्थिर, सध्या फिजिओथेरपीची प्रक्रिया सुरू

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दुखण्यावरील शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून त्यांची प्रकृती उत्तम आहे. एच.एन.रिलायन्स रुग्णालयात त्यांच्यावर सध्या फिजिओथेरपीची प्रक्रिया सुरू असून त्यांना योग्य वेळी डिस्चार्ज देण्यात येईल, असे मुख्यमंत्री कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे.

मानेच्या आणि पाठीच्या दुखण्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना १० नोव्हेंबर रोजी एच. एन. रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेव्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वतःच आपल्या प्रकृती आणि शस्त्रक्रियेसंदर्भात माहिती राज्यातील जनतेला दिली होती. जनतेचे आशिर्वाद पाठीशी असल्याने लवकर तब्येत बरी होईल अशी खात्री त्यांनी व्यक्त केली होती. त्यानुसार रुग्णालयात दाखल झाल्यानंतर १२ नोव्हेंबर रोजी त्यांच्यावर यशस्वी स्पाइन सर्जरी करण्यात आली. एच. एन. रिलायन्स रुग्णालयाचे डॉ. अजित देसाई आणि डॉ. शेखर भोजराज यांच्या निरीक्षणाखाली ते पुढील उपचार घेत आहेत.

मुख्यमंत्र्यांवर मणक्याची यशस्वी शस्त्रक्रिया झाली आहे आणि एचएन रिलायन्स हॉस्पिटलमध्ये त्यांची फिजिओथेरपी सुरू आहे. त्यांची प्रकृती सध्या स्थिर असून त्यांना सध्या लगेचच डिस्चार्ज देण्यात येणार नाही, असे सांगण्यात आले. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी देखील रविवारी उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्याशी फोनवरून बातचीत केली. यावेळी राजनाथ सिंह यांनी ठाकरे यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आणि त्यांना लवकरात लवकर बरे व्हावे यासाठी शुभेच्छा दिल्या.

मुख्यमंत्री ठाकरे यांच्या पाठीच्या कण्यामध्ये रक्ताची गुठळी निर्माण झाल्याने डॉक्टरांना पुन्हा एकदा शस्त्रक्रिया करावी लागली. जेणेकरून रक्ताच्या गुठळ्या काढता येतील. एच.एन रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलच्या १८ व्या मजल्यावरील विशेष ऑपरेशन थिएटरमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर दुसरी शस्त्रक्रिया करण्यात आली. सध्या तरी त्यांना डिस्चार्ज देण्यात येणार नसल्याचे सांगण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular