28.8 C
Ratnagiri
Saturday, August 2, 2025

तटरक्षक दलाचा टिळक रुग्णालयाबरोबर करार

भारतीय तटरक्षक दल हे संरक्षण मंत्रालयाच्या अखत्यारित...

महावितरण-नगरपालिका चिपळुणात आमने-सामने

महावितरण नगर परिषदेचे २०१० पासून मालमत्ता करस्वरूपात...

रत्नागिरीत भरदिवसा दोन फ्लॅट फोडले…

शहरात भरदिवसा चोरट्यांनी दोन बंद फ्लॅट फोडून...
HomeRatnagiriनेवरेचा रिक्षाचालकाचा मुलगा सृजल पारकर झाला अग्निवीर

नेवरेचा रिक्षाचालकाचा मुलगा सृजल पारकर झाला अग्निवीर

महाराष्ट्रासाठी २०० जागा होत्या, त्यातून सृजलची निवड झाली आहे.

तालुक्यातील नेवरे गावचा सुपुत्र सृजल राजेश पारकर याची भारतीय सैन्यदलात अग्निवीर म्हणून निवड झाली आहे. अतिशय कठीण अशा परीक्षा देत त्याने हे यश मिळवले. ग्रामस्थांनी सृजलची बसणी ते नेवरे अशी मिरवणूक काढत त्याचे स्वागत केले. सृजलचे वडील राजेश हे रिक्षाचालक व आई निकिता गृहिणी आहे. मुलाच्या या यशाबद्दल आई वडिलांना प्रचंड आनंद झाला आहे. सृजलने बारावी झाल्यानंतर सीडॅकचा पेपर दिला व त्यात तो उत्तीर्ण झाला. त्यानंतर नेव्हीचे ग्राऊंड, मेडिकल व दुसरा पेपर होता. कुलाबा नेव्हीनगर येथे दुसरा पेपर दिला. अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध झाली व त्याची निवड झाली. त्यानंतर जूनमध्ये तो ओडिसाला हजर झाला.

तिथे वैद्यकीय चाचणी झाली. आता त्याला एव्हिएशन एअर हँडलर बँच मिळाली. आता कारवार येथे प्रशिक्षण होणार असून, कोची येथे पुढील प्रशिक्षणानंतर त्याची नियुक्ती होईल. सृजल शालेय शिक्षण घेत असताना रत्नागिरीच्या किनाऱ्यावर आलेल्या नेव्हीच्या शिप बघण्यासाठी जात होता. आठवीपासून त्याला नेव्ही व जहाजाविषयी आवड निर्माण झाली होती. फाटक हायस्कूलमधील शिक्षक मिलिंद टिकेकर यांच्यासोबत त्याचे या विषयी बोलणे व्हायचे. फेब्रुवारीमध्ये त्याने पहिली परीक्षा दिली. महाराष्ट्रासाठी २०० जागा होत्या. त्यातून सृजलची निवड झाली आहे.

ओडिसाला प्रशिक्षण झाले तेव्हा प्रचंड मेहनत घ्यावी लागल्याचे तो सांगतो. पहाटे ३ वाजता उठावे लागत होते. वातावरणात प्रचंड उष्णता होती. शारीरिक आणि मानसिक परीक्षा घेणारे हे प्रशिक्षण होते, असे त्याने सांगितले. सृजलने मिळवलेल्या यशाबद्दल काढलेल्या मिरवणुकीत बसणी सरपंच साक्षी झगडे, पोलिसपाटील मिलन बंदरकर व ग्रामस्थ सहभागी झाले. तसेच नेवरे सरपंच दीपक फणसे, पोलिसपाटील गणेश आरेकर, गुरुकृपा मंडळ नेवरे मुरगवाडी अध्यक्ष मुकेश मिरकर, पदाधिकारी, पारकर परिवार, ग्रामपंचायत सदस्य अमर गिरकर, सागर मायंगडे, वासुदेव केळकर, माजी सैनिक चंद्रशेखर गांगण उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Most Popular