26.4 C
Ratnagiri
Friday, October 18, 2024

अखिल शेओरानचे लक्ष्य कांस्यपदक, दुसरे पदक भारताच्या झोळीत

ISSF विश्वचषक फायनल भारताची राजधानी नवी दिल्ली...

महिला मतदार ठरवणार दापोलीचा आमदार दापोली मतदारसंघ

विधानसभा निवडणूक जाहीर झाली असून, सर्वांनी आचारसंहितेचे...
HomeChiplunमुंबई-चिपळूण एसटी बसच्या टायरला आग

मुंबई-चिपळूण एसटी बसच्या टायरला आग

एसटी बसचा मागीला टायर पेटत आहे ही बाब चालकाच्याही लक्षात आली नव्हती.

मुंबई-गोवा महामार्गावर मुंबई चिपळूण या एसटी बसच्या टायरला आग लागल्याची घटना नुकतीच घडली. सुदैवाने हि गंभीर बाब वेळीच लक्षात आल्याने फार मोठा अनर्थ टळला आहे. एसटी चालकाच्या मागील उजव्या बाजूस असलेल्या टायरला घर्षणाने आग लागली असल्याचे निदर्शनास आले. दरम्यान स्थानिक ग्रामस्थांनी तातडीने उपलब्ध झालेल्या वाहनाच्या आधारे सदर एसटी बसचा पाठलाग करत गाडीच्या पुढे जावून एसटी चालकाला गाडी थांबवायला सांगितली. दरम्यान आपल्या एसटी बसचा मागीला टायर पेटत आहे ही बाब चालकाच्याही लक्षात आली नव्हती.

सदर घटनेची माहिती मिळताच महाड एमआयडीसीतील केवा कंपनीत काम करणाऱ्या प्रतिक शिंदे या फायरमनने आपल्या कंपनीतील अधिकारी विकास उर्फ राजू सासणे यांच्याशी तातडीने संपर्क साधून आगीविरोधात प्रतिबंधात्मक माहिती घेतली. यावेळी एसटी बस मध्ये असलेले अग्निशमन सिलेंडर हे रिकामे असल्याने महामार्गावरून जाणाऱ्या दुसऱ्या गाडीतील अग्निशमन प्रतिबंधात्मक यंत्रणेने टायरला लागलेली आग विझवण्यास यश आले असल्याचे प्रतिक शिंदे यांनी सांगितले. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई-चिपळूण ही एसटी बस महाडकडून चिपळूणला रवाना झाली असता, मुंबई- गोवा महामार्गावरील चांढवे गावाजवळ एसटी बसचा टायर पेटला, दरम्यान टायरला लागलेली आग लगेचच विझवण्यात आली. त्यामुळे सुदैवाने कोणतीही हानी मात्र झाली नाही.

RELATED ARTICLES

Most Popular