27.1 C
Ratnagiri
Saturday, July 5, 2025

मेरा ई-केवायसी अॅप टाळेल रेशनकार्ड रद्दची कारवाई

ई-केवायसी अपूर्ण असलेल्या जिल्ह्यातील ३ लाख ३...

तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी रत्नागिरीत बँक अधिकाऱ्यावर गुन्हा

'माझी मुलगी सुखप्रीत हिच्याशी जसमिक सिंग याने...
HomeKhedमतदान प्रक्रियेसाठी एसटी बसेस आरक्षित झाल्याने प्रवाशांचे नियोजन फिस्कटले...

मतदान प्रक्रियेसाठी एसटी बसेस आरक्षित झाल्याने प्रवाशांचे नियोजन फिस्कटले…

एस.टी. बसेस निवडणुकीसाठी गेल्याने सोमवारी सकाळपासून ग्रामीण भागात बसेस गेलेल्या नाहीत.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येथील येथील एसटी आगाराच्या ४४ बसेस मतदान साहित्य वाहतुकीसाठी आरक्षित करण्यात आल्याने सलग दोन दिवस लांब पल्यासह तालुक्यातील ग्रामीण भागातील ३७ मार्गावरील ७१ फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. रद्द फेऱ्यांमुळे रेल्वेतून गावी आलेल्या चाकरमान्यांसह ग्रामीण मार्गावर जाणाऱ्या प्रवाशांचा खोळंबा होऊन स्थानकात तासंतास तिष्ठत बसावे लागले. काही प्रवाशांनी खासगी वाहनांचा आधार घेत घर गाठले. उन्हाळी सुट्ट्यांसह मतदान, लग्नसराई आदींसाठी बच्चेकंपनी व कुटुंबियांसह मुंबई, पुणेहून रेल्वे व एसटी बसेसमधून येथे डेरेदाखल झालेल्या चाकरमान्यांना गावी जाणाऱ्या रद्द फेऱ्यांचा फटका बसला.

रद्द झालेल्या फेऱ्यांमुळे स्थान‌कात एकीकडे गाड्यांचा शुकशुकाट तर खोळंबलेल्या प्रवाशांची एकच गर्दी झाली होती. वाहतूक नियंत्रण कक्षात अनेक प्रवाशांनी ग्रामीण मार्गावर गाड्या सोडण्याची मागणी केली. मात्र गाड्याअभावी फेऱ्या सोडण्यास असमर्थता दर्शवणाऱ्या वाहतूक नियंत्रक कर्मचाऱ्यांशी प्रवाशी हुज्जत घालताना दिसून आले. मात्र निवडणुकीच्या कामासाठी गाड्या पाठवण्यात आल्याचे समजताच भर उन्हात पारा चढलेल्या प्रवाशांनी संयम पाळण्यातच धन्यता मानली. चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदारसंघातील ३३६ मतदान केंद्रासाठी सोमवारी येथील गुरूदक्षिणा सभागृहातून दुपारपर्यंत मतदान यंत्रे घेऊन ३ हजार कर्मचारी रवाना झाले.

यासाठी २९ एस.टी. बसेस पाठवल्याने ग्रामीण भागातील प्रवाशांचे अतोनात हाल झाले. मतदारसंघातील प्रत्येक मतदान केंद्रावर मतदान यंत्रे व अधिकारी कर्मचाऱ्यांना पोहोच करण्यासाठी एकूण २९ एसटी बसेस, १७ मिनी बस, ७ जीप, झोनल अधिकाऱ्यांसाठी ३९ जीपची व्यवस्था करण्यात आली होती. मोठयाप्रमाणात एस.टी. बसेस निवडणुकीसाठी गेल्याने सोमवारी सकाळपासून ग्रामीण भागात बसेस गेलेल्या नाहीत. येथील आगाराने ग्रामपंचायतीना पत्रव्यवहार करत रद्द करण्यात आलेल्या बसफेऱ्यांची माहिती दिली होती. मात्र त्यापेक्षा अधिक फेऱ्या रद्द केल्या गेल्याने ग्राम ीन भागात ग्रामस्थ गावातच अडकून पडले. संध्या लग्नसराई सुरू असल्याने एस.टी. बसेसवर अवलंबून असलेली पाहुणे मंडळींचीही मोठी गैरसोय झाली.

RELATED ARTICLES

Most Popular