25.4 C
Ratnagiri
Sunday, August 31, 2025

शिंदेंच्या मंत्र्यांवर लक्ष ठेवण्यासाठी अधिकारी…

राज्यात महायुती असली तरीही भाजपकडून कुरघोडींचे राजकारण...

पेढांबेतील पूल दुरुस्तीच्या प्रतीक्षेत, अवजड वाहतूक बंद

दुरुस्तीअभावी धोकादायक झालेला पेढांबे येथील जुन्या पुलावरून...

जनआरोग्य योजनेतील कार्ड बनवा : एम. देवेंदर सिंह

एकत्रित आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना, महात्मा...
HomeMaharashtraराज्य परिवहन महामंडळ, पुढील प्रवास सीएनजीच्या दिशेने

राज्य परिवहन महामंडळ, पुढील प्रवास सीएनजीच्या दिशेने

पहिल्या टप्यांत १ हजार एसटी सीएनजीवर धावण्याचे उद्दिष्ट समोर ठेवण्यात आले आहे.

राज्यातील १ हजार एसटी गाड्यांचे डिझेल वरून सीएनजीमध्ये रूपांतर केले जाणार आहे. त्यामुळे राज्य परिवहन महामंडळाचा प्रवास ‘ई बस’ नंतर आता सीएनजीच्या दिशेने सुरु झाला असे म्हणणे वावगे ठरणार नाही. पहिल्या टप्यांत १ हजार एसटी सीएनजीवर धावण्याचे उद्दिष्ट समोर ठेवण्यात आले आहे. याचे प्रोटोटाईप बनविण्याचे काम देखील सुरु करण्यात आले असून येत्या महिन्याभरात सर्व चाचणी पूर्ण झाल्या नंतर प्रत्यक्षात सीएनजी बसविण्याचे काम सुरु होईल.

सीएनजी बसच्या सुरुवातीच्या टप्यांत पुणे विभागातील तीन आगारांचा समावेश करण्यात आला आहे. राजगुरुनगर, शिरूर व बारामती हे तीन आगार सीएनजीसाठी प्रथम निवडण्यात आले आहेत. टोरॅन्टो गॅस कंपनीकडून या विभागांना गॅसचा पुरवठा होणार आहे. या तिन्ही विभागाचे दर महिन्याला प्रत्येकी ३० एसटी गाड्या डिझेल वरून सीएनजी मध्ये रूपांतर केले जाणार आहे. दुसऱ्या टप्यांत शहरी भागांतील आगरांचा देखील यामध्ये समावेश केला जाईल.

राज्य परिवहन महामंडळाने इंधनाच्या वाढत्या किंमतीमुळे आणि डिझेलवर होणार खर्च कमी करण्यासाठी तसेच पर्यावरणाच्या दृष्टीने उपयुक्त ठरणाऱ्या इलेक्ट्रिक व सीएनजी बसला प्राधान्य दिले आहे. ई बसला चांगला प्रतिसाद लाभत असल्याने, राज्य परिवहन महामंडळ ज्या १ हजार एसटी गाड्यांचे सीएनजी मध्ये रूपांतर करणार आहे. त्या १ हजार गाड्या या सर्व ८ वर्षां खालील असणार आहे. त्यामुळे त्याची स्थिती चांगली असणार आहे. इंजिनसह अन्य बाबी चांगल्या असतील या उद्देशाने एसटी महामंडळाने हा निर्णय घेतला आहे. कारण साधारणपणे एसटीचे आयुर्मान १५ वर्षांपर्यंतचेच असते.

RELATED ARTICLES

Most Popular