25.6 C
Ratnagiri
Monday, September 1, 2025

कोत्रेवाडीतील कचरा प्रकल्पाला विरोध कायम, उपोषणकर्त्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

कोत्रेवाडी येथील प्रस्तावित डंपिंग ग्राऊंड हटावसाठी ग्रामस्थांनी...

आरवली-संगमेश्वर ते बावनदी येथील खड्डे जैसे थे

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी आरवली-संगमेश्वर ते बावनदी...

मुंबई-गोवा महामार्गासाठी ना. योगेश कदम यांचे गणपतीबाप्पाला साकडे

पुढच्या वर्षी महामार्ग पूर्ण होईल असे दरवर्षी...
HomeMaharashtraकर्मचाऱ्यांचं नुकसान होणार नाही, पण बेशिस्तही खपवून घेतली जाणार नाही – अनिल...

कर्मचाऱ्यांचं नुकसान होणार नाही, पण बेशिस्तही खपवून घेतली जाणार नाही – अनिल परब

एसटी संपाला लागलेले वेगळे वळण पण तरीही कर्मचारी संप पाठी घ्यायला तयार नाहीत. परिवहन मंत्री अनिल परब यांनी त्यांना अनेकदा आवाहन करून देखील विलीनीकरण झाल्याशिवाय संप मागे घेणार नाही यावर कर्मचारी ठाम आहेत.

अनिल परब यांनी कृती समितीसोबत पार पडलेल्या बैठकीनंतर पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी बोलताना परब म्हणाले की, पगारवाढ दिल्यानंतर संपाबाबत जो संभ्रम आहे, त्या  समज गैरसमजाबाबतही चर्चा करण्यात आली आहे. जी आश्वासनं मी देतोय,  काही जाचक अटी असतील त्यावर चर्चा घडून आली आहे. कर्मचाऱ्यांचं नुकसान होणार नाही. पण बेशिस्तही खपवून घेतली जाणार नसल्याचं त्यांनी सांगितलं.

राज्यातील अनेक भागात एसटी कर्मचाऱ्यांचा संप अद्यापही विलिनीकरणाच्या मागणीवर ठाम आहे. अशावेळी अनिल परब आणि एसटी कर्मचारी कृती समितीच्या बैठकीत सातवा वेतन आयोग आणि १० वर्षाचा करार यावर विचार होऊ शकतो,  असं अनिल परब म्हणाले. तसंच संप मागे घ्या असं आवाहन परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांना पुन्हा एकदा केल आहे.

एसटी कर्मचाऱ्यांना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शरद पवार यांच्या मदतीनं फार मोठा दिलासा दिला आहे. विलिनीकरणाचा मुद्दा जो त्यांच्या डोक्यात आहे. सातवा वेतन आयोग द्या आणि करार १० वर्षाचा करार अशीही मागणी आली. त्यावरही विचार केला जाऊ शकतो.

पण आज महाराष्ट्र सरकार चार पाऊले पुढे सरकले आहे, भरघोस वेतनवाढ देखील देण्यात आली आहे. अशावेळी एका मुद्द्यासाठी अडून बसणे, जो मुद्दा सरकारच्या हातातच नाही. त्यामुळे समितीच्या अहवालानंतरच विलिनीकरणावर निर्णय होईल. त्यामुळे एसटी सुरु करण्यासाठी, सामान्य नागरिकांना दिलासा देण्यासाठी, कर्मचाऱ्यांचं देखील आर्थिक नुकसान टाळण्यासाठी कामावर रुजू होण्याचं आवाहन मी करत आहे असे परब म्हणाले

RELATED ARTICLES

Most Popular