27.4 C
Ratnagiri
Friday, August 1, 2025

महावितरण-नगरपालिका चिपळुणात आमने-सामने

महावितरण नगर परिषदेचे २०१० पासून मालमत्ता करस्वरूपात...

रत्नागिरीत भरदिवसा दोन फ्लॅट फोडले…

शहरात भरदिवसा चोरट्यांनी दोन बंद फ्लॅट फोडून...

तळेकांटे-तुरळ मार्गावर खड्ड्यांचा सापळा वाहनचालकांची कसरत

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर तळेकांटे-संगमेश्वर-तुरळ हा प्रवास वाहनचालकांसाठी...
HomeRatnagiriआता सरकार हातावर हात ठेवून बसू शकत नाही – अनिल परब

आता सरकार हातावर हात ठेवून बसू शकत नाही – अनिल परब

एसटी कर्मचारी अजूनही संपावर ठाम असल्याने, हर तर्हेने समाजावून, कारवाई , बदली करून सुद्धा जर संप मिटविण्यासाठी तयार नसतील तर आता शेवट कठोर पाउल उचलावे लागणार असल्याचं अनिल परब यांनी दौर्यावर असताना सांगितले. कारण संपकऱ्याबरोबर इतर जनतेचा सुद्धा विचार करण्यासाठी आम्ही बांधील आहोत असा सज्जड इशाराच अनिल परब यांनी संपकरी कर्मचार्यांना दिला आहे.

विलीनीकरणाच्या मुद्द्याला लावून धरून एसटी कर्मचाऱ्यांनी अनेक ठिकाणी अजूनही संप सुरू ठेवला आहे. त्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांचं निलंबन करण्यात आलं आहे. निलंबित झालेल्यांना बडतर्फ केलं जाऊ शकतं. सरकार हातावर हात ठेवून बसू शकत नाही,  असा इशाराही परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिला आहे. आता पर्यंत १० हजारपेक्षा अधिक कर्मचारी निलंबित झाले आहेत.

अडीच हजारापेक्षा अधिक रोजंदारीवरील कामगारांची सेवा समाप्त करण्यात आली आहे. प्रशासन कारवाईचं एक एक पाऊल पुढे टाकत आहे. जे निलंबित झालेत त्यांची बडतर्फी होऊ शकते. सरकारला अशी कारवाई करण्याची बिलकूल इच्छा नाहीये. परंतु सामान्य जनतेला वेठीस धरून अत्यावश्यक सेवा बंद ठेवण्यात येत असेल तर, आत्ता सरकारही हातावर हात ठेवून बसणार नाही आहे. सरकार सर्व पर्यायांचा विचार करत आहे. ते वापरावे लागतील,  असं परब यांनी सांगितलं.

एसटी कर्मचाऱ्यांना मेस्मा कायदा लावणार की त्यांच्या ऐवजी नवी नोकर भरती करणार?  असा सवाल करण्यात येत आहे. त्यावर या संदर्भात बैठक अजून व्हायची आहे. त्यावर निर्णय घेऊ, असं त्यांनी सांगितलं. एसटीच्या सेवेत आतापर्यंत २२ हजार कर्मचारी परत आले आहेत. एसटीची १२५  डेपोत वाहतूक सुरू आहे. पश्चिम महाराष्ट्र, कोकणात बऱ्यापैकी वाहतूक सुरू आहे. तर विदर्भ मराठवाड्यात कमी प्रमाणात वाहतूक सुरू असून, येत्या २० तारखेनंतर हळूहळू वाहतूक पूर्ववत सुरू होईल,  असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

RELATED ARTICLES

Most Popular