दोन आठवडाभर सुरु असलेल्या आझाद मैदानातील एसटी कर्मचार्यांसोबत सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर ठिय्या मांडून बसले होतेत. परंतु काल झालेल्या सकारात्मक बैठकीमध्ये कर्मचार्यांना मूळ वेतनात अंतरिम वाढ करण्यात आली आहे. आजच्या पत्रकार परिषदेमध्ये सदाभाऊ खोत म्हणाले कि, हे आंदोलन कामगारांनी उभं केलं आहे, त्यामुळे त्याबाबतचा निर्णय आता त्यांनीच घ्यावा. आज यशवंतराव चव्हाणांचा स्मृतीदिन आहे. या दिवशी कामगारांनी निर्णय घ्यावा. आझाद मैदानावरचं आंदोलन तात्पुरतं मागे घेत आहोत. बाकी राज्यभरातलं आंदोलन मागे घ्यायचं की तसंच ठेवायचं, याचा निर्णय कामगारांनी घ्यावा. आंदोलन चालू ठेवलं तर त्यांना पाठिंबा राहिलच, मात्र तो निर्णय सर्वस्वी त्यांनीच घ्यावा, असं मत सदाभाऊ खोत यांनी मांडल आहे.
यावेळी ते म्हणाले की, मागील अनेक वर्षे या कामगारांची मागणी होती कि, जो काही तुटपुंजा पगात्र मिळतो आहे तो वेळेत व्हावा आणि सातवा वेतन आयोग लागू करण्याची मागणी होती. परंतु, शासनाकडून कायमच दुर्लक्ष करण्यात आले. त्यानंतर कामगारांनी संघटना व्यतिरिक्त संपाची हाक दिली. तुटपुंज्या पगारात घरखर्च, मुलांची शिक्षण वगैरे गोष्टी भागत नव्हत्या. सरकार त्यांच्याकडे लक्ष देत नव्हते म्हणून आम्ही सोळा दिवस त्यांच्यासोबत आझाद मैदानात बसलो. प्रत्यके वेळेला टांगती तलवार राहण्यापेक्षा, एकदा विलीनीकरण झाल्यावरच आमचा प्रश्न सुटेल, अशी कामगारांनी भावना व्यक्त केली.
पुढे बोलताना ते म्हणाले की, सरकारने मूळ वेतनात वाढ करुन तात्पुरता दिलासा देण्याचा निर्णय घेतला आहे. कामगारांचं हे मोठं यश आहे, असं मी समजतो. मूळ वेतनात ही वाढ झाली आहे. अनेक वर्षे ही वाढ झालेलीच नव्हती. कामगारांचा हा पहिल्या टप्प्यातील विजय आहे. दर महिन्याच्या दहा तारखेच्या आत पगार देण्याला सरकार बांधील राहिल, अशी सरकारने भूमिका स्पष्ट केली आहे. जरी शासनाने पगारवाढ केली असली तरी, एका बाजूला विलीनीकरणाचा आमचा लढा सुरुच राहणार आहे. न्यायालयाच्या निर्णयानंतर आम्ही दुसरा टप्प्यातला लढा उभा करु.