19.6 C
Ratnagiri
Sunday, November 16, 2025

रेशन दुकानदारांची दिवाळी ‘कडू’, पालकमंत्र्यांना निवेदन देणार

जिल्ह्यातील रेशन दुकानदारांचे जुलै महिन्यापासून थकलेले कमिशन...

४४ कोटींच्या डांबर खरेदीत अनियमितता – बाळ माने

रत्नागिरी पालिकेत २०१४ ते २३ या कालावधीत...

खेर्डी-टेरव मार्ग होणार खड्डेमुक्त, बांधकाम विभागाचे आश्वासन

पुढील पंधरा दिवसांत खेर्डी-टेरव रस्त्यावरील सर्व खड्डे...
HomeRatnagiriस्थानिकांच्या मागणीवर नगराध्यक्षांचे त्वरित शिक्कामोर्तब

स्थानिकांच्या मागणीवर नगराध्यक्षांचे त्वरित शिक्कामोर्तब

रत्नागिरी जिल्ह्यातील कोरोना संक्रमणाची संख्या आता आटोक्यात आली असून, शासनाकडून घालण्यात आलेले अनेक निर्बंध उठविण्यात आले असून, बाजारपेठेतील सर्व दुकाने, मॉल्स,  हॉटेल, नाट्यगृहे, सिनेमागृहे, लहान उद्योगधंदे सुरु करण्यात आले आहेत.

वारंवारच्या वाढत्या महागाईमुळे जनता होरपळली गेली आहे. त्यामध्येच मागील दोन वर्षापासून बंद ठेवण्यात आलेला आठवडा बाजार सुरु करण्याची आग्रही मागणी पालिकेकडे करण्यात येत आहे. त्याचाच सारासार विचार करून, नगराध्यक्ष प्रदीप साळवी यांनी जनतेच्या मागणीचा विचार लक्षात घेऊन येत्या शनिवारपासून आठवडा बाजार भरणार असल्याचे जाहीर केले.

येत्या दोन दिवसामध्ये आठवडा बाजार सुरु करण्यात येणार असल्याचे नगराध्यक्षांनी सांगितले. पण त्यासोबतच जे विक्रेते बाजारात विक्री साठी बसणार आहेत, त्यांच्या साठी विशेष नियमावली आखण्यात आलेली आहे. जरी कोरोना संक्रमण कमी झाले असले तरी, कोरोनाच्या बाबतीतले शासनाने आखून दिलेले नियम हे सर्वांसाठी लागू असणार आहेत.

शहरामध्ये विक्रीसाठी येणारा भाजीपाला हा मुख्यत: पश्चिम महाराष्ट्रातून येतो,  त्यामुळे जिल्ह्यातील विविध भागात आठवडा बाजार भरतात, त्याठिकाणी नागरिकांना चांगल्या प्रकारची भाजी व अन्य उत्पादने कमी दरात उपलब्ध होऊ शकतात. कोरोनाची परिस्थिती निवळल्यानंतर जिल्ह्यात अनेक भागात आठवडा बाजार सुरू झाला आहे. त्यामुळे रत्नागिरीमध्ये सुद्धा काही महिन्यांपूर्वी असणारी कोरोनाची भयावह असणारी स्थिती आता आटोक्यात आली असल्याने स्थानिकांकडून केल्या जाणाऱ्या मागणीवर नगराध्यक्षांनी त्वरितच शिक्कामोर्तब केले आहे.

पूर्वी रत्नागिरीमध्ये दोन ठिकाणी वेगवेगळ्या वारी आठवडा बाजार भरवला जात असे. त्यामध्ये मंगळवारी आयटीआय जवळ आणि शनिवारी आठवडा बाजार परिसरामध्ये असे दोन दिवस आठवडा बाजार भरत होते. परंतु मागील दीड वर्षे आठवडा बाजार बंद असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे.

RELATED ARTICLES

Most Popular