27.9 C
Ratnagiri
Monday, September 26, 2022

आमदार योगेश कदम यांना मिळणार मंत्रिमंडळात संधी…!

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंनी शिवसेनेमध्ये झालेल्या उलथापालथी...

खेड तालुक्यातील राज्य पशुसंवर्धन खात्याच्या १७ दवाखान्यांची स्थिती बिकट

राज्यात सध्या जनावरांवर लंपी त्वचा रोगाचा फैलाव...

नवरात्रीचे औचित्य साधून, महिलांसाठी एक खास अभियान

आज २६ सप्टेंबर २०२२ पासून शारदीय नवरात्रीला...
HomeMaharashtraजर ३१ मार्चपर्यंत संपकरी कर्मचारी कामावर हजर झाले नाहीत, तर.. उपमुख्यमंत्र्यांचा सूचक...

जर ३१ मार्चपर्यंत संपकरी कर्मचारी कामावर हजर झाले नाहीत, तर.. उपमुख्यमंत्र्यांचा सूचक इशारा

आता संपकरी कर्मचाऱ्यांनी इतर कोणाचंही बोलण विचारात न घेता, कामावर हजर व्हावं अशी विनंती अजित पवार यांनी केली आहे

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना कामावर परतण्याचं आवाहन केलं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एसटी कर्मचाऱ्यांना अल्टिमेटम दिला आहे. जर ३१ मार्चपर्यंत हे संपकरी कर्मचारी कामावर हजर झाले नाहीत, तर मग त्यांच्या बाबत कठोर भूमिका घेण्यात येणार असल्याचा सूचक इशारा पवार यांनी दिला आहे. राज्याच्या परिवहन मंत्र्यांनी विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात सदरची भूमिका स्पष्ट केली आहे.

कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाच्या जवळपास नेण्यात आलं आहे. १ ते ३१ मार्चचा पगार १० एप्रिलपर्यंत झाला नाही झाला तर त्याची संपूर्ण जबाबदारी राज्य सरकारने घेतली आहे,  असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. आता संपकरी कर्मचाऱ्यांनी इतर कोणाचंही बोलण विचारात न घेता, कामावर हजर व्हावं अशी विनंती अजित पवार यांनी केली आहे. विद्यार्थ्यांच्या सध्या बोर्डच्या परीक्षा सुरू असून एसटी बसचा संप असल्याने या विद्यार्थ्यांना प्रवास दरम्यान मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागणार आहे.

ग्रामीण दुर्गम भागातील लोकांना, विद्यार्थ्यांना, नोकरदार वर्गाला दळणवळणासाठी परवडणारी वाहने नसल्याने नागरिकांनाही त्रास सहन कारावा लागतोय. या सगळ्यांची अडचण लक्षात घेऊन कर्मचाऱ्यांनी लवकरात लवकर कामावर रूजू व्हावे अशी विनंती पवार यांनी केली आहे. त्याचप्रमाणे, ३१ मार्चपर्यंत एसटी कर्मचाऱ्यांनी कामावर हजर नाही राहिले तर, त्याच्याबद्दल कठोर भूमिका घेऊन कारवाई करण्यात येईल आणि त्यानंतर मात्र कोणतीही वेगळी संधी दिली जाणार नाही, असे अजित पवारांनी स्पष्ट केले आहे.

परिवहन मंत्री अनिल परब यांनी एसटीचा प्रश्न आता सुटलेला आहे याबाबत काल  माहिती दिली. ३१ मार्च पर्यंत हजर होण्याची एसटी कर्मचाऱ्यांना शेवटची संधी दिली गेली आहे. त्यांना पगारवाढ केली आहे, त्याचप्रमाणे महिन्याचा पगार वेळेत म्हणजेच १० तारखेपर्यंत होणार, याची जबाबदारी राज्य सरकारने घेतली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular