26.6 C
Ratnagiri
Wednesday, July 16, 2025

कशेडीत लोखंडी जाळ्यांचे ‘सुरक्षा कवच’

मुंबई-गोवा महामार्गावरील प्रवाशांसाठी कायमची डोकेदुखी ठरलेल्या कशेडी...

धनुष्यबाण कुणाचा? निवडणुकांपूर्वी उध्दव ठाकरेंना मिळणार कौल?

१० दिवसांपूर्वी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे...

सरपंचपदाचे आरक्षण जाहीर होताच काहीजण आनंदित, अनेकांचा हीरमोड

जिल्हयात सोमवारी सरपंचपदाच्या आरक्षणाची लॉटरी निघाली. त्यानंतर...
HomeRajapurरजेच्या दिवशी कामावर आलेल्या वायरमनचा शॉक लागून मृत्यू

रजेच्या दिवशी कामावर आलेल्या वायरमनचा शॉक लागून मृत्यू

मयत गमरे यांचा रविवारी सुट्टी असताना महावितरणच्या अधिकार्‍यांनी त्यांना कामावर बोलवले होते.

सध्या महावितरण आणि त्याची वाढीव बिले याचा वाद सुरु असतानाच रजेच्या दिवशी सुद्धा कार्यतत्परतेने कामावर हजर राहून ड्युटी निभावताना एका वायरमनचा शॉक लागून मृत्यू ओढवला आहे. अनेक कर्मचाऱ्याबद्दल वेळेवर काम न करणे, कामातील बेजबाबदारपणा, हलगर्जीपणा याबाबत कार्यालयामध्ये अनेक तक्रारी नोंदविल्या जातात. परंतु, गमरे हे त्यांच्या हक्काच्या सुट्टीच्या दिवशी देखील, कार्यालयातून फोन आल्यावर कामाच्या जागी हजर राहून दुरुस्तीचे काम देखील सुरु केले.

मुंबई गोवा महामार्गावर ओणी येथील पेट्रोलपंप समोरील महावितरणच्या डिपीवर दुरूस्तीचे काम करत असताना वायरमन प्रकाश बाबू गमरे वय ५२ रा. ओणी या विज कर्मचाऱ्याचा शॉक लागून जागीच मृत्यु झाला आहे. रविवारी सकाळी ११ वाजण्याच्या दरम्यान ही दुर्घटना घडली. घडलेल्या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये मोठ्या प्रमाणात वातावरण तप्त झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मयत गमरे यांचा रविवारी सुट्टी असताना महावितरणच्या अधिकार्‍यांनी त्यांना कामावर बोलवले होते. ते सकाळी ११ वाजण्याच्या दरम्यान ओणी पेट्रोलपंपासमोरील महावितरणच्या डीपीवर दुरूस्तीचे काम करत असताना त्यांना जोरदार शॉक लागून ते जागीच गतप्राण झाले. शॉक लागलेल्या अवस्थे मध्येच ते डीपीला लटकत होते. त्यांना अशा अवस्थेत पासून अनेक गावकऱ्यांचा पारा चढला. त्यांनी त्वरित महावितरण कार्यालयामध्ये याबाबतची माहिती दिली. या घटनेने ग्रामस्थ संतप्त झाले असून घटनास्थळी ग्रामस्थांची तोबा गर्दी झाली होती. अशा कार्यतत्पर कर्मचाऱ्याचे अशा प्रकारे शॉक लागून मृत्यू झाल्याने ओणी गावावर शोककळा पसरली आहे. कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न अजूनही ऐरणीवर असल्याचे समोर आले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular