29.2 C
Ratnagiri
Sunday, July 13, 2025

सावर्डेत मत्स्यपालन, कुक्कूटपालन, कृषी पर्यटनाची शेतीला जोड

वडिलोपार्जित पारंपरिक शेतीला बाजारातील मागणीचा लाभ घेऊन...

चिपळुणात सदोष स्मार्ट मीटर बसवू नका…

स्थानिकांचा विरोध असतानाही अदानी पॉवर कंपनीने जुने...

चिपळूण घरकुलाचे स्वप्न जमीनदोस्त, तहसीलदारांकडे तक्रार

तालुक्यातील कादवड-सुतारवाडी येथील शासकीय योजनेतून मंजूर झालेल्या...
HomeRatnagiriसणासुदीच्या दिवसात एसटीचा प्रवास महागला…

सणासुदीच्या दिवसात एसटीचा प्रवास महागला…

एसटीच्या प्रवासी भाड्यात १० टक्के वाढ करण्यात आली आहे.

सणासुदीच्या दिवसात महाराष्ट्रातील गोरगरिब जनतेचे वाहतूकीचे एकमेव साधन असणारी लालपरी महागली आहे. २५ ऑक्टोबर ते २४ नोव्हेंबर या महिनाभरासाठी एसटीच्या प्रवासी भाड्यात १० टक्के वाढ करण्यात आली आहे. ही हंगामी भाडेवाढ असली तरी त्यामुळे गोरगरीब जनतेच्या खिशाला कात्री लागणार आहे. एसटी महामंडळ तोट्यात आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था चालविणे हे सरकारचे कर्तव्य आहे. अशा वेळी तोट्यात असलेल्या महामंडळाला अर्थसहाय्य करून सरकारने एसटीची सेवा सर्वसामान्यांना परवडेल अशा दरातच देणे अपेक्षित आहे.

मात्र गेली काही वर्षे सणासुदीच्या दिवसात एसटी महामंडळ आपल्या प्रवासी भाड्यात वाढ करत असल्याने प्रवाशांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. २५ ऑक्टोबर ते २४ नोव्हेंबर या महिनाभराच्या कालावधीसाठी महामंडळाने शिवनेरी बस सेवा वगळता एसटीच्या अन्य गाड्यांच्या भाड्यामध्ये १० टक्के वाढ करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. गोरगरिब जनतेसाठी हा निर्णय हानिकारक असल्याने तो तातडीने रद्द करावा अशी मागणी कोकणवासीय प्रवासी संघाचे अध्यक्ष दिपक चव्हाण यांनी केली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular