प्रवासी गावी जाण्यासाठी, कामाला जाण्यासाठी एसटी बसस्थानकावर थांबलेला असतो. मात्र एसटी बस वेळेवर न आल्यास वासनतास एसटी बसची वाट पहावी लागते. त्यावर पर्याय म्हणून आता महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडाळाच्यावतीने रत्नागिरीसह महामंडळाच्या ७५ बसस्थानकांवर म ोफत पुस्तक वाचनालय सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे मोबाईलवर वेळ घालवण्यापेक्षा प्रवाशांना मराठी वृत्तपत्र, कथासंग्रह, स्पर्धा परीक्षेसाठीची पुस्तके उपलब्ध असणार आहे. विशेष म्हणजे स्थानकातील कर्मचाऱ्यांकडे नोंद करून पुस्तके घरी नेवून वाचताही येणार आहेत. त्यामुळे त्यांचा वेळ सतकार्णी लागणार आहे.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त राज्याचे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी राज्यातील ७५ बसस्थानकात पुस्तक वाचनालय सुरू करण्याचा निर्णय घेतला असून त्याची घोषणाही सरनाईक यांनी काही दिवसापूर्वी केली आहे. त्यामुळे प्रवाशांना एसटीची वाट पाहता पाहता मोफत पुस्तके वाचण्यास मिळणार असून आपला वेळ सतकार्णी लागणार आहे. मोबाईलवर वेळ घालवण्यापेक्षा मोफत पुस्तक वाचनालय ठेवल्यामुळे वाचनप्रेमींना एक पर्वणीच मिळणार आहे. यामुळे प्रवाशांच्या ज्ञानात भर पडणार आहे. विद्यार्थ्यांनाही अभ्यासासाठी स्पर्धा परीक्षेची पुस्तके तसेच विविध पुस्तके असणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनाही फायदा होणार आहे. महामंडळाच्यावतीने प्रवाशांसाठी मोफत पुस्तक वाचनालय सुरू करण्याची घोषणा झाली आहे.
रत्नागिरी विभागातील विविध आगारात मोफत पुस्तक वाचनालय सुरू करण्यात येणार आहे. रत्नागिरीकरांना आता बसस्थानकावर विविध मराठी वृत्तपत्र, विविध पुस्तके वाचण्यास मिळणार आहे. त्यामुळे त्यांच्या ज्ञानात भर पडणार आहे, असे रत्नागिरीचे विभाग नियंत्रक प्रज्ञेश बोरसे यांनी सांगितले. एसटी बसंस्थानकावर पुस्तक वाचनालय सुरू करण्याचा एसटी महामंडळाने जो निर्णय घेतला आहे तो स्वागताहार्य आहे. बसस्थानकावर एसटीची वाट पाहताना कंटाळा येतो, मोबाईल किती तास बघायचा. पुस्तक वाचनालय सुरू केल्यास वृत्तपत्र, पुस्तके वाचून ज्ञानात भर पडले, वाचनाची चळवळ निर्माण होईल. विशेष तरूणाईबरोबर सर्वांना वाचनाची ‘आवड होईल, अशी प्रतिक्रिया एका प्रवाशाने व्यक्त केली आहे.