28.7 C
Ratnagiri
Saturday, August 2, 2025

रत्नागिरीत अमली पदार्थ बाळगणारे ७ जण अटकेत

शहराजवळील भाट्ये गावामध्ये गांजा बाळगणाऱ्या ५ तरुणांविरुद्ध...

रत्नागिरी पालिकेत ५५ कंत्राटींना डच्चू…

आर्थिकदृष्ट्या अडचणीत असलेल्या रत्नागिरी पालिकेने आर्थिक शिस्त...

७२ तासानंतर महिलेचा मृतदेह सापडला, चर्चाना फुटलंय पेव

तब्बल ७२ तासांच्या प्रयत्नानंतर अखेर अश्विनी अहिरेचा...
HomeMaharashtraयंदाच्या वर्षी राज्य नाट्य स्पर्धा डिसेंबरपासून सुरू - सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख

यंदाच्या वर्षी राज्य नाट्य स्पर्धा डिसेंबरपासून सुरू – सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख

कोरोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर मागील वर्षीपासून खाजगी, धार्मिक कार्यक्रम रद्द करण्यात आले होते. सद्य स्थितीमध्ये कोरोना संक्रमण आटोक्यात आल्याने, गतवर्षी रद्द करण्यात आलेली, हीरक महोत्सवी राज्य नाट्य स्पर्धा यावर्षी डिसेंबर पासून सुरू होईल, अशी घोषणा सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी आज केली आहे.

सांस्कृतिक कार्य संचालनालया मार्फत घेण्यात येणाऱ्या या स्पर्धांमध्ये राज्यातील विविध केंद्रांबरोबरच राज्याबाहेरील संघांसाठी एक व देशाबाहेरील संघांसाठी एक अशी दोन नवीन ऑनलाइन केंद्रे सुरू करण्यात येतील,  असेही त्यांनी पुढे सांगितले आहे.

संगीत नाट्य स्पर्धा, संस्कृत नाट्य स्पर्धा, मराठी हौशी नाट्य स्पर्धा,  बालनाट्य स्पर्धा,  हिंदी नाट्य स्पर्धा, दिव्यांग नाट्य स्पर्धा अशा विविध नाट्य स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. राज्यातील रंगकर्मींनी या स्पर्धेत अधिकाधिक प्रमाणामध्ये सहभाग नोंदवावा. कोरोना विषयक सर्व नियमांचे पालन करून, प्रयोग सादर करावेत असेही सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी आवाहन केले आहे. त्याचप्रमाणे, दोन वर्षांपूर्वी झालेल्या स्पर्धांचा बक्षीस वितरणा कार्यक्रमही लवकरच घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

राज्याच्या हीरक महोत्सवी व देशाच्या अमृत महोत्सवी तसेच स्पर्धेच्या हीरक महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून स्पर्धेची व्याप्ती अजून वाढविण्याचा मानस असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे राज्याबाहेरील आणि देशाबाहेरीलही मराठी रंगकर्मींसाठी या स्पर्धेचे करण्यात येणारे आयोजन म्हणजे पर्वणीच ठरणार आहे.

श्री देशमुख पुढे म्हणाले की, दरवर्षी या स्पर्धांमधून जवळजवळ हजारो संघ सहभागी होत असतात. या सर्व संघांच्या माध्यमातून जवळपास २० हजार कलाकार वीस लाख प्रेक्षकांपर्यंत पोहोचत असल्याने या स्पर्धेला विशेष महत्त्व प्राप्त होते. यावर्षी अनेक रंगकर्मी,  संस्था, संघटना यांनी या स्पर्धा लवकरात लवकर घ्याव्यात अशी मागणी जोर धरली होती. त्या मागणीस अनुसरून, येत्या डिसेंबरपासून संपूर्ण राज्यात कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन नेमून दिलेल्या केंद्रांवर ही स्पर्धा घेण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

RELATED ARTICLES

Most Popular