26.8 C
Ratnagiri
Saturday, December 9, 2023

गंजलेल्या खांबावर विद्युत वाहिन्या , मोडकाआगारमधील स्थिती

मोडकाआगर येथील नारळ, सुपारी व काजूच्या बागेतील...

पक्षाच्या कोकणातील नेत्यांना संपवण्याचा विडा – रामदास कदम

कोकणातील पक्षाच्या नेत्यांना संपवण्याचा विडा उद्धव ठाकरे...

श्रमदानातून बंधारे उभारल्याने एक कोटीची बचत – पाणी जिरवा मोहीम

पाण्याची बचत व साठवण केल्यास त्याचे उन्हाळ्यात...
HomeMaharashtraप्राथमिक शिक्षकांच्या दोन वर्षापासून रखडलेल्या बदल्याना मिळाला मुहूर्त

प्राथमिक शिक्षकांच्या दोन वर्षापासून रखडलेल्या बदल्याना मिळाला मुहूर्त

राज्यातील शिक्षकांची बदली प्रक्रिया राबविण्यासाठी मागील आठवड्यात व्हीडिओ कॉन्फरन्स घेण्यात आली होती.

मागील दोन वर्षापासून अचानक उद्भवलेल्या कोरोनाच्या संसर्गामुळे प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या करण्यात आलेल्या नव्हत्या. यंदा मात्र शिक्षकांच्या बदल्या होणार असून, त्यासाठी आवश्यक असणाररि पहिल्या टप्प्यातील तयारी सुरू करण्यात आली आहे. यात सूचना ग्रामविकास विभागाने पहिल्या टप्प्यात जिल्हा बदली पात्र शिक्षकांची नावे, मोबाईल नंबर, मेल आयडी, आधार क्रमांक यासह अन्य आवश्यक माहिती २५ मार्चपर्यंत अपडेट करण्याच्या दिली आहे. दरवर्षी साधारणपणे ३१ मेच्या आतमध्येच शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया पूर्ण करण्यात येते.

राज्यातील शिक्षकांची बदली प्रक्रिया राबविण्यासाठी मागील आठवड्यात व्हीडिओ कॉन्फरन्स घेण्यात आली होती. या व्हीसीला जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, प्राथमिक शिक्षणाधिकारी, सचिव कुमार, उपसचिव प्रवीण जैन,  के.जी. वळवी आदी संबंधित उपस्थित होते. यात मुख्य १२ विषयांवर चर्चा झाली असून त्यामध्ये शिक्षकांच्या बदल्यांसाठी यू-डायसनुसार शाळा आणि शिक्षकांची माहिती अद्ययावत करणे, शिक्षकांचे रोष्टर अद्ययावत करून त्यास विभागीय आयुक्तांची मंजुरी घेणे, शिक्षकांचे आधार अपडेट करणे, शिक्षकांचे समानिकरण करणे, अवघड क्षेत्रातील शाळा निश्चित करणे, न्यायालयाच्या आदेशानुसार शिक्षकांच्या नेमणुका करणे आदी विषयाचा समावेश होता.

यात शिक्षकांच्या बदल्यांसाठी त्यांची माहिती अपडेट करण्यासाठी २५  मार्चची डेडलाईन देण्यात आलेली आहे. यासाठी शिक्षकांची माहिती काळजीपूर्व दुरूस्त करून अचूकपणे भरावी,  सर्व माहिती इंग्रजीत असावी, शिक्षकांची बदलेल्या माहितीचा रंग पिवळा असावा,  बदलून आलेल्या शिक्षकांच्या नावाचा रंग लाल असावा, शिक्षकांच्या जन्म तारीख काळजी भरावी, बारा अंकी आधार नंबर अचूक असावा, पॅन नंबरची माहिती घ्यावी, शालार्थ आयडीत कोणताही बदल करून नयेत, यासह अन्य महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या आहे. त्यामुळे अखेर दोन वर्षापासून थांबलेली बदलीची प्रक्रिया मार्गी लागली असल्याने शिक्षकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.

RELATED ARTICLES

Most Popular