27.6 C
Ratnagiri
Saturday, July 27, 2024

चिपळूण शहरामध्ये मगरीचा वावर, पेट्रोलपंपात आढळली

वाशिष्ठी नदीतील गाळ काढताना शहरातील सखल भाग...

वादळी वाऱ्याने गुहागरमध्ये मोठे नुकसान…

वादळी वाऱ्यासंह कोसळणाऱ्या पावसाने संपूर्ण गुहागर तालुक्याला...

आरजू टेस्कोल फसवणूक, संचालकांविरुद्ध दोषारोपपत्र

आरजू टेस्कोल कंपनीविरोधात गुंतवणकूदारांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात...
HomeRatnagiriजिल्ह्यातील ६ पोलीस उपनिरीक्षकांना सहायक पोलीस निरीक्षक पदावर बढती

जिल्ह्यातील ६ पोलीस उपनिरीक्षकांना सहायक पोलीस निरीक्षक पदावर बढती

अनेक गुन्हे पोलिसांच्या सतर्कतेमुळे, उघडकीस आले आहेत त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये गुन्ह्यांचे प्रमाण पाहायला गेले तर कमी झाले आहे.

रत्नागिरी जिल्ह्यामध्ये गुन्ह्यांची उकल काही तासातच करण्यासाठी पोलीस यंत्रणा प्रसिद्ध आहे. मागील अनेक वर्षापासून अनेक गुन्हे पोलिसांच्या सतर्कतेमुळे, उघडकीस आले आहेत त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये गुन्ह्यांचे प्रमाण पाहायला गेले तर कमी झाले आहे. पोलिसांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल आणि सेवा ज्येष्ठतेनुसार रत्नागिरी जिल्हा पोलीस दलातील ६ पोलीस उपनिरीक्षकांना सहायक पोलीस निरीक्षक पदावर बढती मिळाली आहे. बढतीनंतर त्यांची बदलीही दुसऱ्या ठिकाणी झाली आहे.

त्यामध्ये शहर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले धनंजय चव्हाण यांची सहायक पोलीस निरीक्षक ठाणे या ठिकाणी बढती झाली आहे. रत्नागिरी नियंत्रण कक्षात कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक विजय कार्वेकर  त्यांची कोल्हापूर येथे सहायक पोलीस निरीक्षकपदी बढती झाली आहे. सागरी सुरक्षा शाखेत असलेले विक्रमसिंह पाटील यांची सहायक पोलीस निरीक्षक महामार्ग सुरक्षा पथकात नियुक्ती करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे शाखेत कार्यरत असलेले संदीप वांगणेकर यांची सहायक पोलीस निरीक्षक दहशतवाद विरोधी पथकात पदोन्नती मिळाली आहे.

चिपळूण पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले विनायक माने यांची ठाणे येथे सहायक पोलीस निरीक्षकपदी बढती झाली आहे.गुहागर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले दीपक कदम यांची मुंबई शहरात सहायक पोलीस निरीक्षक पदी पदोन्नती मिळाली आहे. काम करताना मिळणारी कौतुकाची थाप आणि बढती हि अतिशय महत्वाची गोष्ट आहे. त्यामुळे मागील वर्षापासून अनेक कार्यतत्पर पोलीस कर्मचाऱ्यांना बढती मिळाली आहे. यंदा जिल्ह्यातील या सहा पोलीस कर्मचाऱ्यांना बढती मिळाली असून, या सर्वांचे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.मोहीतकुमार गर्ग यांनी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular