26.1 C
Ratnagiri
Thursday, March 13, 2025

चिपळूण – कऱ्हाड रेल्वेमार्गाचे स्वप्न अधांतरीच, खासदार तटकरे यांचे आश्वासनही हवेत

राज्याच्या अर्थसंकल्पात चिपळूण-कऱ्हाड रेल्वेमार्गासाठी आर्थिक तरतूद करण्यात...

राजापूर तालुक्यात डॉक्टर नियुक्तीमधील धरसोडीमुळे संताप

प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये एमबीबीएस डॉक्टर नसताना कंत्राटी...
HomeRatnagiriअनोळखी मयतबाबत निवेदन...

अनोळखी मयतबाबत निवेदन…

औषधोपचारासाठी शासकीय रुग्णालय येथे दाखल केले.

एक अनोळखी पुरुष वय अंदाजे ३५ वर्ष, अंगात पांढऱ्या रंगाचा फुट टि शर्ट, नेसणीस निळ्या रंगाची हाफ पँट, पायात पांढऱ्या रंगाचे चप्पल १२ डिसेंबर २०२४ रोजी रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास समीना जेटी नवीन मच्छिमार्केटच्या मागे, मिरकरवाडा येथे दारु प्यायलेल्या बेशुध्द स्थितीत आढळून आला. जेटीवरील बोट बांधायच्या लोखंडी पाईपला आपटून पडल्याने त्याच्या डोक्याला समोरुन नाकाला, गालाला दुखापत झाल्याने बेशुध्द अवस्थेत पडलेला होता. सदर इसमाला औषधोपचारासाठी शासकीय रुग्णालय येथे दाखल केले असता त्याच्यावर औषधोपचार सुरु असताना मयत झाल्याचे शासकीय रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले. सदर मयत व्यक्ती अनोळखी असून ओळख पटविण्यासाठी पवन कांबळे, पोलीस उपनिरीक्षक, रत्नगिरी शहर पोलीस ठाणे येथे संपर्क साधावा.

मयत अनोळखी महिला संगम्मा वय ६५ वर्षे, वर्ण निमगोरा, डाव्या हाताची पाचही बोटे तुटलेली, भाषा दाक्षिणात्य या प्रादेशिक मनोरुग्णालय येथे मानसिक आजारावरील उपचार घेत होत्या. १४ मे २०२४ रोजी त्यांना लिव्हरच्या त्रासामुळे प्रादेशिक मनोरुग्णालयातून ससून हॉस्पीटल पुणे येथे दाखल करण्यात आले. उपचार सुरु असताना १० जून २०२४ रोजी सदर महिला मयत झाल्याचे तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले. मयत महिला आपल्या स्वत:ची व कुटूंबाची अथवा गावाची माहिती देण्यास असमर्थ होती. तरी या मयत महिलेची ओळख पटविण्यासाठी बा.ना.कदम पोहेकॉ/३६१ रत्नागिरी शहर पोलीस ठाणे येथे संपर्क साधावा.

RELATED ARTICLES

Most Popular