25.2 C
Ratnagiri
Sunday, January 25, 2026

उपनगराध्यक्ष-अभियंता यांच्यात खडाजंगी रत्नागिरी नगरपालिका

रत्नागिरी नगरपालिकेच्या आवारात आज सायंकाळी उपनगराध्यक्ष समीर...

शहरातील अतिक्रमणांवर आज हातोडा रत्नागिरी पालिका आक्रमक

शहरातील अतिक्रमणाविरोधात पालिका आक्रमक झाली आहे. यातून...

दापोलीत ठाकरेंच्या उमेदवाराचा अर्ज अवैध

पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीसाठी सुरू...
HomeSindhudurgजंजिरे राजकोटवरील छ. शिवरायांचा पुतळा जमीनदोस्त !

जंजिरे राजकोटवरील छ. शिवरायांचा पुतळा जमीनदोस्त !

भारतीय नौदलाच्या वतीने हा पुतळा उभारण्यात आला होता.

जलदुर्ग ‘सिंधुदुर्ग’ शेजारच्या जंजिरे राजकोटवर उभारलेला हा शककर्ते छ. शिवाजी महाराजांचा पुतळा काल रात्री म्हणे वाऱ्याने जमीनदोस्त झाला.

मोदींच्या हस्ते अनावरण – पंतप्रधान ना. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सुमारे ८ महिन्यांपूर्वी म्हणजेच दि. ४ डिसें. २०२३ रोजी छ. शिवाजी महाराजांच्या या पुतळ्याचे अनावरण झाले होते. भारतीय नौदलाने त्यावेळी मालवण किनारपट्टीवर नौदल दिन साजरा केला. त्या निमित्ताने भारतीय नौदलाच्या वतीने हा पुतळा उभारण्यात आला होता.

मध्यरात्री कोसळला – या पुतळ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे असल्याची चर्चा त्यावेळेपासून जनतेत खुलेआम सुरु होती. खुद्द भारतीय नौदलाच्या अखत्यारीत हा पुतळा उभारण्यात आल्याने तो शेकडे वर्षे टिकणारा मजबूत असा असावा अशीच जनतेची अपेक्षा होती, परंतु केवळ ८ महिन्यातच तो काल मध्यरात्री धाडकन कोसळला आणि जमीनदोस्त झाला.

निकृष्ट दर्जाचे काम ? – मालवण – किनारपट्टीवर काल कोणताही मोठा म्हणावा असा वारा सुटलेला नव्हता, परंतु मुळातच निकृष्ट दर्जाचे काम असल्याने हे घडले अशीच चर्चा आज सकाळपासून केवळ मालवण परिसरातच नव्हे तर साऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेत खुलेआम सुरु झाली आहे.

अवशेष विखुरले – रात्री फार मोठा वारा नसतानाही पुतळा धाडकन कोसळला व संपूर्ण पुतळ्याचे अवशेष इतस्ततः पसरले गेले. पुतळ्याचे डोके, पाय, हात, शरीराचे भाग हे सर्व अवशेष इतस्ततः पडलेले असल्याचे नागरिकांनी पाहिले आणि मग शिवभक्तांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येऊ लागला.

मतांचे राजकारण – छ. शिवाजी महाराजांचे स्मारक हे घाईगडबडीत तयार करुन शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर लोकसभा निवडणुकीसाठी काहींना करावयाचा होता. परंतु त्यांनी पुतळ्याचे सौंदर्य व मजबुती याकडे किंचीतही लक्ष दिले नाही अशी सडेतोड़ चर्चा आता जनतेत सुरु झाली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular