कोरोनामुळे सगळेच व्यवस्थापन बदलले असून, शैक्षणिक गुंतागुंत तर खूप प्रमाणात वाढली आहे. मागील वर्षीप्रमाणेच यावर्षी देखील शाळा ऑनलाईनच असण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे सर्व अभ्यासक्रम जसा ऑनलाईन तसाच परीक्षा देखील ऑनलाईन घेण्यात आल्या आहेत, तर काही रद्द सुद्धा करण्यात आल्या आहेत.
१० वी, १२ वी च्या परीक्षा रद्द झाल्या तर, निकालाच्या दिवशी सुद्धा भयानक परिस्थिती उद्भवली होती. अनेक परीक्षा कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे पुढे जाऊन जाऊन रद्द होतात, तर काही परीक्षांचे तारीख पे तारीख सुरु आहे. अनेक परीक्षांच्या तारखांचा पुरता गोंधळ उडालेला आपण पाहत आहोत. काही परीक्षा तर घ्यायच्या आहेत, पण कशा घेणार! ऑनलाईन कि ऑफलाईन असा गोंधळ सातत्याने होत आहे.
पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेच्या तारखेची अशीच स्थिती झाली आहे. एक तारीख जाहीर करून पुन्हा ती बदलण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेततर्फे घेतल्या जाणाऱ्या या परीक्षेची तारीख आधी ८ ऑगस्ट होती, आता परीक्षेची तारीख पुन्हा बदलण्यात आली असून ही तारीख एक दिवसाने पुढे ढकलून ९ ऑगस्ट करण्यात आलेली. पण या तारखेमध्येही आत्ता बदल करण्यात आला आहे.
कोरोना परिस्थितीमुळे अखेर महाराष्ट्र शिष्यवृत्ती परीक्षा ही १२ ऑगस्टला घेण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. दरवर्षी पाचवी आणि आठवीच्या वर्गात शिकणारे सुमारे १० लाखांहुन अधिक विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी नोंदणी करतात, परंतु या वर्षी या संख्येमध्ये प्रचंड घट झाली असून, यंदा राज्यातील एकूण ४७ हजार ६१२ शाळांमधील ६ लाख ३२ हजार ४७८ विद्यार्थ्यां शिष्यवृत्ती परीक्षेसाठी प्रविष्ठ होणार आहेत.