23.7 C
Ratnagiri
Friday, November 22, 2024

OPPO Find X8, Find X8 Pro डायमेंसिटी 9400 प्रोसेसर, AMOLED डिस्प्लेसह लॉन्च…

OPPO ने अलीकडेच आपले फ्लॅगशिप स्मार्टफोन OPPO...

‘पुष्पा 2: द रुल’, अल्लू अर्जुनची जादू पुन्हा चालेल…

2021 च्या ब्लॉकबस्टर चित्रपट 'पुष्पा: द राइज'चे...
HomeKhedएसटीचा पुन्हा धाब्यांवर थांबा; प्रवाशांची लूट…

एसटीचा पुन्हा धाब्यांवर थांबा; प्रवाशांची लूट…

एस. टी.चे महागड्या हॉटेलवरील थांबे हे प्रवाशांना डोकेदुखी ठरत आहेत.

प्रवाशांच्या सेवेकरिता असे ब्रीदवाक्य असलेल्या एसटीने मात्र प्रवाशांना आर्थिक भूर्दंड देण्याचा निर्णय पुन्हा एकदा घेतला. खाजगी हॉटेल्स व धाब्यांवर एसटीला थांबा दिल्याने प्रवाशांची लूट होते. या निर्णयामुळे प्रवाशांना चढ्या दाराने खाद्यपदार्थ विकत घ्यायला लागत असल्याने त्यांच्या खिशाला चाट बसत आहे. तसेच दुसरीकडे एसटी स्थानकामध्ये भाड्याने दिलेले स्टॉल व कॅन्टीन प्रवासी ग्राहकांविना ओस पडले आहेत. या अन्यायकारक निर्णयाविरोधी यापूर्वीही प्रवाशांनी आवाज उठवल्याने एसटी प्रशासनाने काही दिवसांकरिता या खासगी हॉटेल्स व ढाब्यांवरील एसटीचे थांबे बंद केले होते.

गोरगरिबांची लालपरी म्हणून ओळख असलेल्या एसटीबरोबर सर्वसामान्य प्रवाशांची नाळ जोडलेली आहे. एसटीचा प्रवास स्वस्त, सोयीचा व सुरक्षित. असल्याने सर्वसामान्य नागरिक एसटीच्या प्रवासाला पसंती देतात, परंतु एसटी महामंडळाने पेण तालुक्यातील हॉटेलांवर एसटी थांबवण्याची परवानगी दिली.. एसटी महामंडळाच्या अल्पोपहार केंद्रावर गाडी थांबत नसल्याने या केंद्रांवर आता सन्नाटा दिसू लागला, तर खासगी हॉटेल्सची चंगळ दिसून येते. एस. टी.चे महागड्या हॉटेलवरील थांबे हे प्रवाशांना डोकेदुखी ठरत आहेत.

ज्या एसटी गाड्यांना परवानगी नाही त्या गाड्यासुद्धा अर्थपूर्ण संबंध जपण्याकरिता या ढाब्यांचा आश्रय घेतात. ढाब्यावर एक तास गाडी थांबते, तर एसटी स्टँडला केवळ गाडीची नोंद करण्याकरिताच थांबते. खासगी हॉटेल्सचे थांबे बंद करून महामंडळाच्या एसटी स्थानकातील मान्यता दिलेल्या खानावळ, अल्पोपहारगृहात प्रवाशांना स्वस्त व उत्तमप्रकारचे पदार्थ देण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी प्रवासीवर्ग करीत आहे.

RELATED ARTICLES

Most Popular