27.7 C
Ratnagiri
Saturday, July 12, 2025

शेती संरक्षणासाठी हवे विमा कवच – कृषी विभाग

नैसर्गिक आपत्ती, कीड वा रोगासारख्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये...

गडनरळ ग्रामस्थ ‘वाटद’बाबत सकारात्मक

वाटद एमआयडीसी जमीन भूसंपादनाबाबत आज वैयक्तिक हरकतींवरील...

रत्नागिरीनजीक मिऱ्या येतील उधाणात वाहून जाणाऱ्यास जीवदान

शहराजवळील मिऱ्या समुद्रकिनारी मोठी दुर्घटना होता होता...
HomeKhedकशेडी बोगद्याच्या वाहतुकीतील अडथळे दूर,वाहनचालकांचा प्रवास सुस्साट

कशेडी बोगद्याच्या वाहतुकीतील अडथळे दूर,वाहनचालकांचा प्रवास सुस्साट

बोगद्यापासून काही अंतरावर दोन्ही बाजूंना अत्याधुनिक यंत्रसामुग्री तैनात आहे.

मुंबई गोवा महामार्गावरील बहुचर्चित कशेडी बोगद्याच्या वाहतूक व्यवस्थेतील अडथळे राष्ट्रीय महामार्ग विभागाने दूर केल्याने वाहनचालकांचा प्रवास पुन्हा वेगवान अन् आरामदायी झाला आहे. सुरक्षित प्रवासासाठी बोगद्याच्या दुतर्फा काही अंतरावर अत्याधुनिक यंत्रसामुग्री तैनात केली. याशिवाय दिमतीला ठेकाधारक कंपनीचे शंभरहून अधिक कामगारही कार्यरत आहेत. पावसाळ्यात उद्भवणाऱ्या अडथळ्यांवर मात करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग विभाग सज्ज असून अपघातप्रवण ठिकाणी सुसज्जता ठेवली आहे. कशेडी येथील वाहतूक पोलीस मदत केंद्राकडूनही महत्वाच्या ‘स्पॉट ‘वर लक्ष केंद्रीत केले आहे. कशेडी बोगद्यात वाहतुकीत कुठल्याही प्रकारचा अडथळा येणार नाही, यादृष्टीने महामार्ग विभागाने आवश्यक त्या उपाययोजनांचा अवलंबे केला आहे.

बोगद्यापासून काही अंतरावर दोन्ही बाजूंना अत्याधुनिक यंत्रसामुग्री तैनात आहे. यात पोकलेन, जेसीबी, क्रेन व इतर आवश्यक मशिनरी आहेत. वाहतूक व्यवस्थेत कुठल्याही प्रकारचा अडथळा निर्माण झाल्यास तातडीने दूर करण्यासाठी ठेकाधारक कंपनीचे १०० हून अधिक कामगारही कार्यरत आहेत. याशिवाय वाहतूक पोलिसांनाही बोगद्याच्या दोन्ही बाजूने मार्गस्थ होणाऱ्या वाहनांवर लक्ष असेल. कशेडी बोगद्यातून दोन्ही बाजूकडील वाहनचालकांचा प्रवासा सुरक्षित होण्याच्या दृष्टीने आवश्यक ती खबरदारी घेण्यात आली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular