30 C
Ratnagiri
Friday, May 9, 2025

रत्नागिरी लोहमार्ग पोलिस ठाण्यांना कुलूप

कोकणरेल्वे मार्गावरील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी कोकण रेल्वेच्या...

वाशिष्ठीतील गाळासाठी ७० जणांचे अर्ज – स्वखर्चाने वाहतूक

चिपळूण शहरांमध्ये पुराचे पाणी भरते त्याला वाशिष्ठी...

जिल्हा परिषदेत कर्मचाऱ्यांना बदल्यांचे वेध

जिल्हा परिषद व पंचायत झालेल्या अधिकारी, कर्मचान्यांना...
HomeRatnagiriवादळी वाऱ्याने गुहागरमध्ये मोठे नुकसान…

वादळी वाऱ्याने गुहागरमध्ये मोठे नुकसान…

नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनाकडूनही नुकसान किंवा आपत्तीनंतर त्वरित कार्यवाही केली जात आहे.

वादळी वाऱ्यासंह कोसळणाऱ्या पावसाने संपूर्ण गुहागर तालुक्याला झोडपून काढले आहे. या वादळी वाऱ्याचा फटका घरे, गोठे आणि झाडांना बसला आहे. यामुळे मोठे नुकसान झाले आहे. गुहागर नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनाकडूनही नुकसान किंवा आपत्तीनंतर त्वरित कार्यवाही केली जात असल्याने नागरिकांनाही दिलासा मिळत आहे. वरचापाटतर्फे गुहागर येथील अमिता आनंद खरे यांचे गोठ्याचे छत कोसळून त्यांचे सुमारे २५ हजाराचे नुकसान झाले आहे. खोडदे येथील अभिजित शिवराम साळवी यांचे घराचे सुमारे २५ हजार ५०० रकमेचे, सुरळ येथील आनंदी धोंडू जड्याळ यांचा अतिवृष्टीने गोठ्याचे १४ हजार ३०० रुपयांचे, अनिता चंद्रकांत चव्हाण यांच्या गोठ्याचे ४ हजाराचे नुकसान झाले आहे.

आरे येथील माधुरी श्रीनिवास भोसले यांचे घराच्या पडवीचे छत कोसळून १५ हजाराचे, अडुर येथील दीपक प्रकाश जाधव याच्या राहत्या घरावर आंब्याचे झाड पडून घराचे अंदाजे १८ हजार ९०० रुपयांचे नुकसान झाले आहे. लिटिल चॅम्प इंग्लिश मीडियम स्कूल जानवळे येथे शाळेचा बांध कोसळून १६ हजार रुपयांचे, वेळंब वचनवाडीमधील निर्मला नारायण पोसरेकर यांच्या घराचे पत्रे उडून ३ हजाराचे नुकसान झाले. वेळंब कातळवाडीमधील निर्मला राणे यांच्या घराचे पत्रे उडून २ हजाराचे, नम्रता नितीन गुरव यांच्या शौचालयाचे पत्रे उडून २ हजार ४०० रुपयांचे नुकसान झाले.

आरेमधील प्रमिला प्रकाश देवकर यांच्या घराचे पत्रे उडून २५ हजाराचे नुकसान झाले असून कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. घाडेवाडीतर्फे वेळंबमधील जि. प. पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा नं. २ शाळेच्या सभागृहाचे पत्रे व इमारतीचे कौले उडून ९ हजार ५०० रुपयांचे, नरवण येथील विजया दत्तात्रय नाटुस्कर यांचे गोठ्यावर झाड पडल्याने ७ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. निवोशी येथील योगिता एकनाथ दणदणे याच्या घराचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाले. वसंत गोपाळ धुमक याच्या घरावर फणसाचे झाड पडून १४ हजारांचे तर मारूती मंदिर येथील प्रमोद रामा भायनक याच्या घरावर नारळाचे झाड पडून २४ हजार ९०० रुपयांचे नुकसान झाले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular