26.9 C
Ratnagiri
Monday, September 1, 2025

कोत्रेवाडीतील कचरा प्रकल्पाला विरोध कायम, उपोषणकर्त्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

कोत्रेवाडी येथील प्रस्तावित डंपिंग ग्राऊंड हटावसाठी ग्रामस्थांनी...

आरवली-संगमेश्वर ते बावनदी येथील खड्डे जैसे थे

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी आरवली-संगमेश्वर ते बावनदी...

मुंबई-गोवा महामार्गासाठी ना. योगेश कदम यांचे गणपतीबाप्पाला साकडे

पुढच्या वर्षी महामार्ग पूर्ण होईल असे दरवर्षी...
HomeRatnagiriपावसवासीय मोकाट जनावरांमुळे त्रस्त, कारवाईची मागणी

पावसवासीय मोकाट जनावरांमुळे त्रस्त, कारवाईची मागणी

कोणत्याही वाहनाने धडक दिल्यास जखमी झाल्याचे कळताच संबंधित मालक त्या ठिकाणी काही क्षणात हजर होतात. आणि पैशाची मागणी करतना दिसतात

जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मोकाट भटक्या जनावरांचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे. रस्ते अडवून बसलेय अनेक जनावरांमुळे अपघाताच्या घटना घडत आहेत. अनेक ठिकाणी अपघात होऊन जीवितहानी सुद्धा घडत असल्याने अशा जनावरांच्या मालकांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी जन सामन्यातून जोर धरत आहे.

सध्या कातळ आणि सड्यांवर गावात मोठ्या प्रमाणात सुकेलेले असल्याने अनेक मालक आपल्या जनावरांना चरायला सोडतात. त्यामुळे मोकाट जनावरांच्या झुंडीच्या झुंडी रस्त्यावर देखील वावरताना दिसतात. पावसमध्ये मोठ्या प्रमाणात मोकाट जनावरांचा वावर दिवसेंदिवस वाढत आहे. ही गुरे रस्त्यावर ठिय्या देत असल्यामुळे वाहनचालकांसाठी धोकादायक ठरत आहेत. या भागातील जनावरांच्या मालकांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

पावसमध्ये मोठ्या प्रमाणात मोकाट जनावरे रस्तोरस्ती फिरत असतात. संबंधित मालक जनावरे मोकाट सोडून देतात. मात्र कोणत्याही वाहनाने धडक दिल्यास जखमी झाल्याचे कळताच संबंधित मालक त्या ठिकाणी काही क्षणात हजर होतात. आणि पैशाची मागणी करतना दिसतात, एरवी आपल्या जनावरांकडे लक्ष देखील देत नाहीत, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

ग्रामपंचायतीकडे कोंडवाडा नसल्याने त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. मात्र वाहतुकीच्या मार्गावरच या जनावरांनी रस्ता रोको केल्याने, वाहन चालकांना पर्यायाने या परिसरात येणाऱ्या पर्यटकांचा विनाकारण  वेळ वाया जातो. त्यामुळे या समस्येवर तातडीने ठोस उपाययोजना करणे आवश्यक असल्याने, संबंधित जनावरांच्या मालकांवर कारवाईचे कठोर पाउल उचलणे गरजेचे आहे. जेणेकरून, भविष्यात अशा प्रकारे  जनावरांना राजरोसपणे मोकळ सोडणाऱ्या मालकांवर जरब राहील.

RELATED ARTICLES

Most Popular