25.2 C
Ratnagiri
Saturday, March 15, 2025

चिपळूण – कऱ्हाड रेल्वेमार्गाचे स्वप्न अधांतरीच, खासदार तटकरे यांचे आश्वासनही हवेत

राज्याच्या अर्थसंकल्पात चिपळूण-कऱ्हाड रेल्वेमार्गासाठी आर्थिक तरतूद करण्यात...

राजापूर तालुक्यात डॉक्टर नियुक्तीमधील धरसोडीमुळे संताप

प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये एमबीबीएस डॉक्टर नसताना कंत्राटी...
HomeChiplunचिपळुणातील रस्त्यांनी घेतला मोकळा श्वास, अतिक्रमणांवर दुसऱ्या दिवशीही हातोडा

चिपळुणातील रस्त्यांनी घेतला मोकळा श्वास, अतिक्रमणांवर दुसऱ्या दिवशीही हातोडा

व्यापाऱ्यांसह अन्य व्यवसाय करणाऱ्या विक्रेत्यांनी रस्त्यावरच बस्तान मांडले आहे.

नगरपालिकेने शहरातील अतिक्रमणांवर गुरुवारी पोलिस बंदोबस्तात जेसीबी फिरवण्यास सुरवात केली आहे. दुसऱ्या दिवशीही ही कारवाई सुरू होती. भाजी मंडई, बाजार पूल, पानगल्ली येथील अतिक्रमणे हटवण्यात आली. चिपळूण शहरातील मध्यवर्ती बसस्थानकासमोरील परिसरासह भोगाळे, जुना एसटी स्टँड परिसर, पानगल्ली मोकळा श्वास घेताना दिसत आहे. कारवाईदरम्यान किरकोळ बाचाबाची झाली. गेल्या काही वर्षांपासून चिपळूण शहरात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण होताना दिसत आहे. त्यामुळे वाहनचालकांसह पादचाऱ्यांना चालणे कठीण झाले आहे. मध्यवर्ती बसस्थानक, भोगाळे, चिंचनाका, जुना बसस्थानक, भाजी मंडई, बाजारपेठ, पानगल्ली, बहादूरशेख नाका आदी भागांत नियमित व्यापाऱ्यांसह अन्य व्यवसाय करणाऱ्या विक्रेत्यांनी रस्त्यावरच बस्तान मांडले आहे. याबाबत नागरिकांमधून ओरड होत होती. अखेर पालिकेने गुरुवारी अतिक्रमणांवर जेसीबी फिरवण्यास सुरुवात केली.

काही विक्रेत्यांनी स्वतःहून आपले खोके, हातगाड्या हटवल्या, तर काहींना कारवाईला सामोरे जावे लागले. ही कारवाई दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारीही सुरू होती. यामध्ये भाजी मंडई, जुना एसटी स्टँड परिसर, पानगल्ली, जुना, बाजार पूल येथील अतिक्रमणे हटवण्यात आली. यावेळी किरकोळ बाचाबाची झाली. यावेळी मुख्याधिकारी विशाल भोसले, सतीश दंडवते, प्रशासकीय अधिकारी मंगेश पेढांबकर, कार्यालय अधीक्षक रोहित खाडे, नगर अभियंता दीपक निंबाळकर, मालमत्ता विभागप्रमुख सागर शेडगे, अतिक्रमणमुक्त विभागप्रमुख संदेश टोपरे, आरोग्य निरीक्षक महेश जाधव, सुजित जाधव, आरोग्य विभागप्रमुख वैभव निवाते, उद्यान विभागप्रमुख प्रसाद साडविलकर, अभिलेख व भांडारप्रमुख वलीद वांगडे आदी अधिकाऱ्यांसह पोलिस बंदोबस्त, अशी यंत्रणा या कारवाईत सहभागी झाली होती.

RELATED ARTICLES

Most Popular