28.2 C
Ratnagiri
Saturday, August 2, 2025

महावितरण-नगरपालिका चिपळुणात आमने-सामने

महावितरण नगर परिषदेचे २०१० पासून मालमत्ता करस्वरूपात...

रत्नागिरीत भरदिवसा दोन फ्लॅट फोडले…

शहरात भरदिवसा चोरट्यांनी दोन बंद फ्लॅट फोडून...

तळेकांटे-तुरळ मार्गावर खड्ड्यांचा सापळा वाहनचालकांची कसरत

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर तळेकांटे-संगमेश्वर-तुरळ हा प्रवास वाहनचालकांसाठी...
HomeLifestyleस्ट्रेस बस्टर - स्ट्रेस बॉल

स्ट्रेस बस्टर – स्ट्रेस बॉल

आताच्या काळात सगळेच जण विविध प्रकारच्या तणावातून जात असतात. परंतु जेंव्हा हा ताण मनुष्यावर भारी पडतो, तेव्हा वेळीच वैद्यकीय उपचार घेणे गरजेचे आहेत. काही जण या तणावातून शांती मिळावी म्हणून झोपेच्या गोळ्यांचा आधार घेतात. परंतु त्या औषधांचा शरीरावर घातक परिणाम होत असतो. त्याऐवजी इतर काही उपाय योजना करणे उपयुक्त ठरू शकते.

त्यामध्ये काही जण स्ट्रेस बॉलच्या सहाय्याने मदतीने बऱ्याच अंशी तणाव कमी करू शकता असे एका संशोधनातून पुढे आले आहे. परदेशातील मानसोपचारतज्ज्ञांनी याबाबत सुमारे पाचशे जणांना अशाप्रकारचे स्ट्रेस बॉल्स वापरण्यास दिले व ते वापरताना त्यांना काय फरक जाणवतो, फायदा काय होतो याचे निरीक्षण नोंदविले. संशोधकांच्या मते मज्जासंस्था चांगली ठेवण्यासाठी स्ट्रेस बॉल्स खूप सहायक ठरू शकतात.

आपले मनगट, हात आणि आसपासच्या बऱ्याचशा वाहिन्या या थेट मेंदूशी जोडलेल्या असतात. तुम्ही स्ट्रेस बॉलवर जसे दाब टाकता तसे त्या शरीराच्या वाहिन्या आणि स्नायू उत्तेजित होतात. तसेच त्याच्यामध्ये हालचाल निर्माण झाल्याने ते बळकट देखील बनतात.

रोजच्या जगण्यात वेगवेगळ्या समस्यांबाबत वारंवार विचार करता. तेव्हा यामुळे तुमचा तणाव वाढायला लागतो. अशा वेळी स्ट्रेस बॉल्सचा वापर टेन्शन दूर करण्यासाठी केला असता, काळजी तर दूर होतेच सोबत एकाग्रता वाढते. यामुळे तुम्हाला सुद्धा रीफ्रेश्ड वाटण्यास मदत होते. कोणत्याही प्रकारची शारीरिक इजा झाल्यानंतर स्ट्रेस बॉल्सचा वापर करणे फायदेशीर मानले जाते. स्ट्रेस बॉल्समुळे हातांचा लवचिकपणा वाढण्यासही मदत मिळते.

स्ट्रेस बॉलमुळे मनगट आणि हातांच्या आसपासच्या स्नायूंचा व्यायाम तर घडतोच,  परंतु यामुळे अनेक प्रकारचा स्ट्रेचिंगचा व्यायामही होतो. तथापि, शरीरातील धमन्या एकमेकांशी जोडलेल्या असल्याने, स्ट्रेस बॉलमुळे शरीराच्या धमन्या उत्तेजित होऊन संपूर्ण शरीराचा व्यायाम होतो. ताण दूर करण्यासाठी यासोबतच योग, व्यायाम, पुरेशी झोप,  ध्यान, प्राणायाम यामुळेही ताणाचे व्यवस्थापन योग्य रितीने करता येते.

RELATED ARTICLES

Most Popular