28.7 C
Ratnagiri
Sunday, November 23, 2025

रेशन दुकानदारांची दिवाळी ‘कडू’, पालकमंत्र्यांना निवेदन देणार

जिल्ह्यातील रेशन दुकानदारांचे जुलै महिन्यापासून थकलेले कमिशन...

४४ कोटींच्या डांबर खरेदीत अनियमितता – बाळ माने

रत्नागिरी पालिकेत २०१४ ते २३ या कालावधीत...

खेर्डी-टेरव मार्ग होणार खड्डेमुक्त, बांधकाम विभागाचे आश्वासन

पुढील पंधरा दिवसांत खेर्डी-टेरव रस्त्यावरील सर्व खड्डे...
HomeMaharashtraबोर्डाच्या परीक्षेसंदर्भात विद्यार्थ्यांसाठी निर्बंध कडक

बोर्डाच्या परीक्षेसंदर्भात विद्यार्थ्यांसाठी निर्बंध कडक

विलेपार्लेतील परीक्षा केंद्रावर १२ वी रसायनशास्त्र पेपर फुटल्याचा वाद झाल्यावर मुंबई विभागीय शिक्षण मंडळाने आक्रमक भूमिका घेतली आहे.

राज्यात सर्वत्र सध्या दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा सुरु आहेत. आणि त्यामध्येच पेपरफुटीची प्रकरणे मोठ्या प्रमाणात वाढत चालल्याची दिसून येत असल्याने, विद्यार्थ्यांसाठी निर्बंध कडक करण्यात आले आहेत.

पेपरफुटीच्या पार्श्‍वभूमीवर दहावी-बारावीच्या परीक्षांवर नवे निर्बंध घालण्यात आले असून आता सोबत मोबाईल आणणार्‍या विद्यार्थ्यांना परीक्षेस बसू दिले जाणार नाही. परीक्षेला उपस्थित राहण्याची जी वेळ ठरवून दिलेली आहे, त्याच वेळेमध्येच उपस्थित राहणे बंधनकारक करण्यात आले आहे. परीक्षेस अर्धा तास आधी हजर राहण्याचे जाहीर केले असताना उशिराने म्हणजे साडे दहानंतर येणार्‍या विद्यार्थ्यांना परत घरी पाठविण्यात यावे,  असे स्पष्ट निर्देशही शिक्षण मंडळाने जारी केले आहेत.

परीक्षेला एक मिनिटही उशिरा येणार्‍या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात प्रवेश न देण्याच्या निर्णयावर मंडळ ठाम असून आता विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर १०.३० वाजता पोहोचावे लागेल. विलेपार्लेतील परीक्षा केंद्रावर १२ वी रसायनशास्त्र पेपर फुटल्याचा वाद झाल्यावर मुंबई विभागीय शिक्षण मंडळाने आक्रमक भूमिका घेतली आहे.

रसायनशास्त्राच्या प्रश्नपत्रिकेचा काही भाग परीक्षा सुरू झाल्यानंतर एका विद्यार्थिनीच्या मोबाईल व्हॉट्सअ‍ॅपवर आढळून आला. मुंबई विभागीय शिक्षण मंडळ अध्यक्ष नितीन उपासनी, सचिव डॉ.सुभाष बोरसे यांनी विभागातील सर्व केंद्र संचालक व उपकेंद्र संचालकांची ऑनलाईन बैठक घेतली. परीक्षा केंद्रापर्यंत परीक्षार्थी मोबाईल आणतातच कसे, असा महत्त्वाचा मुद्दा या बैठकीत उपस्थित झाला. केंद्रप्रमुखांना परीक्षार्थ्याचे उशिरा येण्याचे कारण सयुक्तिक वाटले तरच कस्टोडियन आणि विभागीय मंडळाचे अध्यक्ष किंवा सचिव यांची परवानगी घेऊनच परीक्षार्थ्यास प्रवेश देता येईल. मात्र उशिरा आलेल्या परीक्षार्थ्यास परीक्षागृहात अजिबात प्रवेश मिळणार नाही. त्याचप्रमाणे मोबाईल घेऊन येणाऱ्या विद्यार्थांन प्रवेश नाकारण्यात येणार असल्याच्या भूमिकेवर शिक्षण मंडळ ठाम आहे.

RELATED ARTICLES

Most Popular