26.8 C
Ratnagiri
Friday, November 22, 2024

OPPO Find X8, Find X8 Pro डायमेंसिटी 9400 प्रोसेसर, AMOLED डिस्प्लेसह लॉन्च…

OPPO ने अलीकडेच आपले फ्लॅगशिप स्मार्टफोन OPPO...

‘पुष्पा 2: द रुल’, अल्लू अर्जुनची जादू पुन्हा चालेल…

2021 च्या ब्लॉकबस्टर चित्रपट 'पुष्पा: द राइज'चे...
HomeRatnagiriकंत्राटी आरोग्यसेविकांचे कामबंद आंदोलन

कंत्राटी आरोग्यसेविकांचे कामबंद आंदोलन

वारंवार या कर्मचाऱ्यांना मानधन वाढ तसेच कायमस्वरूपी नोकरीचे आश्वासन देण्यात आले.

कंत्राटी आरोग्यसेविकांना नियमित रिक्त पदांवर समायोजन करावे, या मागणीसाठी मुंबई येथील आझाद मैदानावर दोन दिवसाचे धरणे आंदोलन झाले. ठोस आश्वासन न मिळाल्यामुळे बुधवारपासून कंत्राटी आरोग्यसेविकांनी कामबंद आंदोलनाला सुरवात केली आहे. या आंदोलनात जिल्ह्यातील १४७ कंत्राटी आरोग्यसेविका सहभागी झाल्या आहेत. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानात गेली अनेक वर्षे कंत्राटी आरोग्यसेविका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषध निर्माण अधिकारी इत्यादी संवर्गातील कंत्राटी पद्धतीने कर्मचारी प्रामाणिकपणे व तुटपुंज्या मानधनावर काम करत आहेत. वारंवार या कर्मचाऱ्यांना मानधन वाढ तसेच कायमस्वरूपी नोकरीचे आश्वासन देण्यात आले.

या प्रश्नासंदर्भात सध्या टप्प्याटप्प्याने राज्यभर आंदोलन सुरू आहे. पहिल्या टप्प्यातील आंदोलन गेल्या आठवड्यात जिल्हा परिषद कार्यालयासमोर पार पडले. त्यानंतर दुसरा टप्प्यातील आंदोलन मुंबई येथील आझाद मैदानावर सोमवार व मंगळवार असे दोन दिवस केले. या आंदोलनात जिल्ह्यातील १०० पेक्षा जास्त कंत्राटी आरोग्यसेविका व कर्मचारी सहभागी झाल्या होत्या. त्यामध्ये सुप्रिया पाटकर, सेजल रसाळ, हर्षिता रसाळ, पुष्पा शेलार, प्रियांका भालेकर, प्रज्ञा कदम, विद्या गावडे, सायली शिवगण, सोनाली डोर्लेकर, दीपाली जाधव आदींचा सहभाग होता.

आझाद मैदानावर झालेल्या आंदोलनावेळी आरोग्यमंत्र्यांची भेट घेतली. त्या वेळी भरती करतेवेळी किमान ३० टक्के कंत्राटी आरोग्यसेविकांना प्राधान्य देण्यात येईल. त्यांची थेट नियुक्ती करण्यात येईल, असे आश्वासन दिले; मात्र जोपर्यंत शासन लेखी किंवा जीआर काढत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय राज्य संघटनेने घेतला आहे. त्यानुसार आता तिसऱ्या टप्प्यातील आंदोलन सुरू झाले असून, बुधवारपासून कामबंद करण्यात आले आहे. त्याचा परिणाम आरोग्यसेवेवर होणार आहे

RELATED ARTICLES

Most Popular