25.6 C
Ratnagiri
Monday, October 13, 2025

दहावी, बारावी बोर्ड परीक्षेसाठी राजमार्ग

कोकण व कोल्हापूर विभागीय मंडळाचे अध्यक्ष राजेश...

जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना नोटिसा…

आपापल्या जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्यकेंद्रांकडे दुर्लक्ष केल्याचा ठपका...

पूररेषेतील बांधकामांसाठी अटीत शिथिलता

शहरातील पूररेषेतील बांधकामांसाठी नगरविकास खात्याच्या नियमांमध्ये शिथिलता...
HomeRatnagiri१५ दिवसांत रस्ते दुरुस्त न झाल्यास अधिक तीव्र आंदोलनः बाळ माने

१५ दिवसांत रस्ते दुरुस्त न झाल्यास अधिक तीव्र आंदोलनः बाळ माने

नागरिक, रिक्षाचालक आणि व्यावसायिक प्रचंड त्रस्त झाले आहेत.

रत्नागिरी शहरातील खराब रस्त्यांमुळे नागरिकांच्या होत असलेल्या हालअपेष्टा लक्षात घेऊन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे आज शहरात चक्काजाम आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व माजी आमदार बाळ माने यांनी केले. १५ दिवसांच्या आत रस्ते दुरुस्त न झाल्यास अधिक तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. ‘विठ्ठलाच्या पायी वीट, रस्त्याविना आलाय वीट’, ‘रस्ते नाही फक्त खड्डे आणि वेदना’ असे फलक धरत आणि नगर परिषद प्रशासन, पालकमंत्री यांचा निषेध करीत शिवसेना उबाठाच्या पदाधिकाऱ्यांनी रत्नागिरी शहरातील मारुती मंदिर येथे चक्काजाम आंदोलन केले. यावेळी उबाठांच्या पदाधिकायांनी जोरदार घोषणाबाजी करीत नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. आंदोलनादरम्यान माने यांनी सत्ताधाऱ्यांवर तीव्र शब्दांत टीका करत म्हटले की, रत्नागिरीतील रस्त्यांची दुर्दशा पाहता नागरिक, रिक्षाचालक आणि व्यावसायिक प्रचंड त्रस्त झाले आहेत.

पालकमंत्री शहरात असतानाही रस्त्यांची एवढी दुरवस्था कशी काय? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी पंधरा दिवसात शहरातील रस्ते खड्डेमुक्त होणार असल्याचे म्हटले आहे, त्यामुळे पंधरा दिवसानंतर उबाठाचे पदाधिकारी पुन्हा एकदा पाहणी करणार आहेत, जर खड्डे भरले गेले नाहीत तर तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. उबाठाचे चक्काजाम आंदोलन असल्याने शहर पोलिसांच्यावतीने मोठा पोलीस फौजफाटा मारुती मंदिर येथे ठेवण्यात आला होता. उबाठाचे उपनेते बाळ माने यांच्या नेतृत्वाखाली तालुकाप्रमुख शेखर घोसाळे, शहरप्रमुख प्रशांत साळुंखे, संघटक प्रसाद सावंत, बिपीन शिवलकर, सलील डाफळे, नितीन तळेकर, किरण तोडणकर, राजश्री शिवलकर यांच्यासह मोठ्या संख्येने उबाठाचे पदाधिकारी, महिला पदाधिकारी, युवासेनेचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.

माजी आमदार आणि उपनेते बाळ माने यांनी यावेळी जोषपूर्ण शब्दात सहकार्यांसह मारुती मंदिर सर्कल येथे चक्काजाम करीत, नागरिकांनीही या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले. हे आंदोलन सनदशीर आणि लोकशाही मार्गाने करण्यात आले. शहरातील विविध भागांतून शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. आंदोलनादरम्यान पोलिसांसोबत माने यांची शाब्दिक चकमकही झाली, मात्र परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली. माने यांनी अखेरीस प्रशासन आणि राज्य सरकारकडे तातडीने रस्त्यांची दुरुस्ती करण्याची मागणी केली.

RELATED ARTICLES

Most Popular