28.7 C
Ratnagiri
Thursday, August 7, 2025

रत्नागिरीजवळ भाट्ये येथे अपघात…

रत्नागिरी ते पावस जाणाऱ्या रस्त्यावर भाट्ये गावाकडे...

राजापूर तालुक्यामध्ये आढळली अतिदुर्मीळ ‘हंसतुरा’ प्रजाती

राजापूर तालुक्यात पावसाळ्यात उगवणारी, एक अतिदुर्मीळ आणि...

कोल्हापूरकरांसमोर ‘वनतारा’ झुकलं ! ‘महादेवी’ पुन्हा नांदणी मठात येणार

हत्तीणीला पुन्हा पाठवण्यात येणार आहे. वनताराचे सीईओ...
HomeRatnagiri'अटलांटिस' प्रक्षेपणाचा विद्यार्थ्यांनी घेतला अनुभव

‘अटलांटिस’ प्रक्षेपणाचा विद्यार्थ्यांनी घेतला अनुभव

राईट बंधूंच्या पहिल्या विमानापासून ते अपोलो मिशनापर्यंतचा प्रवास अनुभवला.

जिल्हा परिषदेतील १४ विद्यार्थी आणि पाच अधिकारी व शिक्षक यांच्या नासा दौऱ्याची सुरुवात वॉशिंग्टन येथून झाली. यामध्ये अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पी. डी. यादव, विस्तार शिक्षणाधिकारी संदीप कडव यांच्यासह दोन शिक्षक, वैद्यकीय अधिकारी सहभागी झाले आहेत. पहिल्या दिवशी मुलांनी अमेरिकेचा इतिहास, विज्ञान आणि संस्कृतीविषयी माहिती घेतली. त्यानंतर स्मिथसोनियन हवाई आणि अवकाश संग्रहालयात मुलांनी अंतराळयान, विमान, शास्त्रीय शोध आणि चंद्रावर जाण्याचा थरारक इतिहास पाहिला. राईट बंधूंच्या पहिल्या विमानापासून ते अपोलो मिशनापर्यंतचा प्रवास अनुभवला. नॅशनल म्युझिअन ऑफ नेचर हिस्ट्री या ठिकाणी प्रागैतिहासिक डायनासोरच्या सांगाड्यांपासून ते दुर्मिळ खनिजे, कीटक आणि सागरी जीवनाचा अभ्यास मुलांना करता आला. या संग्रहालयात डायनॉसोरचे सांगाडे, प्राण्यांचे नमुने, खनिजं व रत्ने, फुलपाखरांचे नमुने, समुद्री जीवन आणि माणसाच्या उत्क्रांतीचा इतिहास पाहायला मिळाला.

शैक्षणिक गॅलरीमार्फत विज्ञान आणि निसर्ग यांची ओळख विद्यार्थ्यांनी करून दिली गेली. अमेरिकन संसद भवन, अब्राहम लिंकन मेमोरियल, अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन यांचे स्मारक, मार्टिन ल्युथर किंग ज्युनिअर यांचे स्मारक, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे अधिकृत निवासस्थान म्हणजेच व्हाईट हाऊसही पाहिले. या ठिकाणी सुरक्षितता, वास्तुशास्त्र आणि प्रशासन या विषयी मुलांना प्रत्यक्ष माहिती मिळाली. नासाच्या केनेडी स्पेससेंटरला दिलेली भेट आगळीवेगळी ठरली. अंतराळ संशोधनाचा थक्क करणारा प्रवास या ठिकाणी जवळून अनुभवता आला. विद्यार्थ्यांनी फ्लोरिडामधील ऑरलैंडोजवळ असलेल्या नासाच्या केनेडी स्पेस सेंटरला शैक्षणिक भेट दिली. ही भेट केवळ शिक्षणापुरती नव्हे तर अंतराळाच्या अद्भुत जगाची थेट अनुभूती देणारी ठरली.

नासाच्या आर्टेमिस मिशनसह भविष्यातील विविध मोहिमांची माहिती येथे दिली गेली. विद्यार्थ्यांनी येथे अंतराळातील प्रवासाचा अनुभव घेतला. या सिम्युलेटर्सद्वारे त्यांनी विविध ग्रहांवरील अंतराळ प्रवासाचा अनुभव घेतला. अंतराळातील दृश्ये आणि तारे-ग्रह यांचे दर्शन, मंगळ ग्रहावर उतरल्यासारखा अनुभव, मानवाच्या अंतराळातील मोहिमांची झलक, भविष्यातील अंतराळ प्रवास आणि नव्या शोधांची काल्पनिक सफर याचा विद्यार्थ्यांनी अनुभव घेतला तसेच आयमॅक्स थिएटरमध्ये नासाच्या अंतराळ रॉकेट प्रोग्रॅम्सवर आधारित चित्रपट विद्यार्थ्यांनी पाहिला. यात अपोलो, सॅनर्न व्ही, आर्टमिस व एसएलए मिशनचे प्रभावशाली सादरीकरण करण्यात आले होते.

आधुनिक मोहिमांची घेतली माहिती – यंदाचा अमेरिका दौऱ्यातील शैक्षणिक भेट विद्यार्थ्यांसाठी अत्यंत ज्ञानवर्धक आणि प्रेरणादायी ठरली आहे. त्यांनी केवळ नासाच्या ऐतिहासिक आणि आधुनिक मोहिमांची नव्हे तर प्रत्यक्ष अनुभव व अवकाश शास्त्राविषयी अगदी जवळून माहिती घेतल्याचे या दौऱ्यात सहभागी झालेल्या जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

RELATED ARTICLES

Most Popular