24.6 C
Ratnagiri
Sunday, November 10, 2024

चिपळुणातील सामान्यांचा एसटी प्रवास खडतर

प्रवासी संख्या वाढल्याने एसटीला अच्छे दिन येऊ...

मिऱ्या गावामध्ये उबाठाला खिंडार शेकडो युवकांचा शिवसेनेत प्रवेश

रत्नागिरी-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघातील उबाठा, महाविकास आघाडीचे उमेदवार...

रामदासभाई कदम यांचे उद्धव ठाकरेंना उघड आव्हान…

कोकाकोला कंपनीचा अर्ज तुमच्याकडे मुख्यमंत्री झाल्यानंतर कधी...
HomeRatnagiriशाळेच्या पहिल्याच दिवशी एसटीच्या वेळापत्रकात गोंधळ

शाळेच्या पहिल्याच दिवशी एसटीच्या वेळापत्रकात गोंधळ

संपूर्ण राज्याला कोरोनाचा फटका बसला असताना, त्यामधून सामन्यातील सामान्य सुद्धा चांगलाच भरडला गेला आहे. दीड वर्षापासून कोरोनामुळे बंद असलेल्या शैक्षणिक संस्था ४ ऑक्टोबरला उघडण्याची परवानगी मिळाली. शहरी ते ग्रामीण भागामध्ये मोठ्या उत्साहात विद्यार्थ्यांचे पहिल्या दिवशी स्वागत करण्यात आले.

राज्य सरकारने काढलेल्या आदेशानुसार ४ ऑक्टोबर रोजी मोठ्या उत्साहाने ग्रामीण भागातील शाळा सुरू करण्यात आल्या. या निर्णयाला अनुसरून विद्यार्थ्यांसह पालकांनीही उत्साह दाखवला. मात्र, संगमेश्वर तालुक्यातील कुंभारखाणी हायस्कूलमधील ६६ विद्यार्थ्यांना एसटी बससाठी बसथांब्यावर दोन तास ताटकळत बसावे लागले. एवढा वेळ थांबून सुद्धा अपेक्षित बस आलीच नाही.

५.३० पर्यंत घरी पोहोचणारी आपली मुले सायंकाळी उशिरापर्यंत घरी न पोहोचल्याने पालकांनी काळजीसह संताप व्यक्त केला. स्थानिकांनी पुढाकार घेत या सर्व विद्यार्थ्यांना घरपोच सोडण्यासाठी गावातील खासगी वाहनांचा वापर केला. मात्र यामध्ये विद्यार्थ्यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला.

याप्रकरणी कुंभारखाणी उपसरपंच अनिल सुर्वे, राजिवली उपसरपंच संतोष येडगे आणि  कुचांबे उपसरपंच समीर चव्हाण यांनी देवरूख व चिपळूण एसटी विभागाला विनंती करत शाळेच्या वेळेत सुटणाऱ्या बसेस नियमित वेळापत्रकानुसारच सोडण्याची विनंती केली. विद्यार्थ्यांचे कोणत्याही प्रकारे हाल होणार नाहीत, याची खबरदारी एसटी प्रशासनाने घ्यावी आणि एसटी बससेवा सुरळीत चालू ठेवावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

कुटगिरी येडगेवाडी, काळंबेवाडी, शिर्केवाडी, निकमवाडी, राजिवली बौध्दवाडी, रातांबी,  कदमवाडी, कुचांबे आणि कुंभारखाणी टाकेकोंड आदी गावांमधून कुंभारखाणी हायस्कूल येथे एसटी बसने ६६ विद्यार्थी दररोज प्रवास करतात. दि. ४ ऑक्टोबर रोजी शाळा सुरू झाल्या. या सर्व विद्यार्थ्यांनी शाळेत हजेरी लावली खरी मात्र एसटीच्या नियोजनशून्य कारभाराचा फटका या ६६ विद्यार्थ्यांना चांगलाच बसला.

RELATED ARTICLES

Most Popular