29.4 C
Ratnagiri
Sunday, November 24, 2024

सर्वाधिक 1 लाख 11 हजार 335 मते मिळवून उदय सामंत विजयी

रत्नागिरी, दि. 23 (जिमाका) :- 266 रत्नागिरी...

OPPO Find X8, Find X8 Pro डायमेंसिटी 9400 प्रोसेसर, AMOLED डिस्प्लेसह लॉन्च…

OPPO ने अलीकडेच आपले फ्लॅगशिप स्मार्टफोन OPPO...

‘पुष्पा 2: द रुल’, अल्लू अर्जुनची जादू पुन्हा चालेल…

2021 च्या ब्लॉकबस्टर चित्रपट 'पुष्पा: द राइज'चे...
HomeMaharashtraमुंबईत अचानक धो-धो पाऊस, रस्त्यांना नद्यांच रूप, रेल्वे लेट

मुंबईत अचानक धो-धो पाऊस, रस्त्यांना नद्यांच रूप, रेल्वे लेट

वादळी वाऱ्यासह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

गेल्या काही दिवसांच्या विश्रांतीनंतर बुधवारी सायंकाळी पावसाने मुंबईला चांगलेच झोडपून काढले. अचानक सुरु झालेल्या धो-धो पावसाने सायंकाळी कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे मोठे हाल झाले.. त्यातच लोकलसेवा विलंबाने धावू लागल्याने अनेकांना ताटकळत थांबावे लागले. त्यामुळे रेल्वेस्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी पहायला मिळाली. अचानक ऐवढा पाऊस कोसळला की रस्त्यांना नदीचे स्वरूप आल्यासारखे दिसत होते. मध्ये म ार्गावरील रेल्वे सेवा २० ते २५ मिनिटांनी विस्कळीत झाली होती. तर, पश्चिम मार्गावर जलद लोकल १५ ते २० मिनिटे उशिराने असून स्लो मार्गावरील लोकल ५ ते ६ मिनिटांनी उशिराने धावत होती.

तर, कांजूरमार्ग, भांडूप आणि मुलुडं येथील रस्त्यांवर पाणी साचल्याने नद्यांचं रुप आलं आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली होती. गणेशोत्सव काळातही पाऊस झाला नाही. परंतु, बुधवारी अचानक पावसाच्या रिमझिम सरी कोसळू लागल्या. तर, सायंकाळनंतर या रिमझिम सरींचे रूपांतर मुसळधार पावसात झाले. त्यामुळे कार्यालयीन कामे आटोपून घरी परतणाऱ्या नोकरदारवर्गाचे चांगलेच हाल झाले. रस्त्यांवर पाणी साचल्याने रस्ते वाहतूक विस्कळीत झाली आहे.

तर, मध्य रेल्वे आणि पश्चिम मार्गावरही रेल्वे सेवा विस्कळीत झाली होती. त्यामुळे अनेक प्लॅटफॉर्मवर तुफान गर्दी पाहायला मिळाली. त्तर काहीजणांनी कार्यालयातच आसरा घेतला आहे. राज्यात सोमवारपासून मोसमी पाऊस पुन्हा एकदा सक्रिय होणार असल्याचा अंदाज, हवामान विभागाने व्यक्त केला होता.

तापमानात होणार घट – कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून त्याच्या प्रभावामुळे पुढील चार ते पाच दिवस महाराष्ट्र व लगतच्या भागात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. राज्यात पुढील चार ते पाच दिवस वादळी वाऱ्यासह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडेल, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. दरम्यान, वातावरणात वाढलेली आर्द्रता आणि मुंबईत पावसाचे प्रमाण कमी झाल्याने मुंबईकर उकाड्याने हैराण झाले आहेत. मागील दोन दिवस कमाल तापमानातही वाढ झाली आहे. मात्र, आता पुढील आठवड्यात अपेक्षित पावसानंतर तापमानात काही अंशी घसरण होण्याची आणि उकाड्यापासून काहिसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

RELATED ARTICLES

Most Popular