26.4 C
Ratnagiri
Friday, July 4, 2025

कामथेतील नदीत प्रदूषित पाणी विधानसभेत निकमांनी उठवला आवाज

नद्यांमध्ये रासायनिक सांडपाणी सोडणारे टँकर आणि साफ़यीस्ट...

रत्नागिरी रत्नदुर्ग किल्ल्यावरून पडलेली तरूणी नाशिकची?

रत्नदुर्ग किल्ल्यावरून रविवारी दुपारी खाली समुद्रात कोसळलेल्या...

चिपळूण-रत्नागिरी मार्ग होणार खड्डेमुक्त : पालकमंत्र्याचे आश्वासन

पावसाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी पालकमंत्री उदय सामंत...
HomeLifestyleसुधा मूर्तींच्या सुखी आयुष्य जगण्याच्या विशेष टिप्स

सुधा मूर्तींच्या सुखी आयुष्य जगण्याच्या विशेष टिप्स

काही गोष्टींकडे दुर्लक्ष केल्यास तुम्ही सुखी आयुष्य जगू शकता.

आज कालच्या जगात सुधा मूर्तीनी आपल्याला खऱ्या जीवनाचा अर्थ समजावून सांगितला आहे. या दोघांचे नाते आपल्याला खरोखरचं कपल गोल्स देतात. काही गोष्टींकडे दुर्लक्ष केल्यास तुम्ही सुखी आयुष्य जगू शकता. या गोष्टीची जाणीव आपल्याल सुधा मूर्ती सहजरित्या समजावून सांगतात. जर तुम्हाला सुखी आयुष्य जगायचे असेल तर यासाठीच लेखिका सुधा मूर्ती यांनी काही टिप्स दिल्या आहेत.

लग्न ही आपल्या आयुष्यातील खूप महत्त्वाची घटना असते. लग्नानंतर आयुष्य बदलून जाते. आपल्या आयुष्यात एखाद्या व्यक्तीला जागा देणे ही गोष्ट तितकी सोपी नसते. एखादे नाते टिकवून ठेवण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात. पण आज कालच्या जगात गोष्टी फार बदल्या आहेत. जर आपल्याला एखाद्या व्यक्तीची कोणती गोष्ट आवडली नसेल तर नातं जपण्याचा प्रयत्न न करता, आपण त्या व्यक्तीपासून दूर होतो. काही वेळा खरचं दूर जाणे देखील आवश्यक असते.

सुधा मूर्तीनी एका मुलाखती दरम्यान सुखी जीवनासाठी प्रत्येक व्यक्तीला तसेच जोडीदाराला पर्सनल  स्पेस देणं महत्त्वाचं आहे. वैवाहिक जीवनामागे हे एक महत्त्वाचे कारण म्हणजे एकमेकांच्या आवडीचा आदर करा. एकमेकांवर बंधन लादू नका. तुम्ही दोघे भिन्न आहेत परंतु अशात त्यांनी एकमेकांच्या जागेचा आणि आवडीचा आदर केला पाहिजे. असे केल्यास तुमच्या जोडीदाराच्या मनात तुमच्या बद्दल आदर निर्माण होईल.

एकमेकांच्या विभिन्न गोष्टींचा आदर करण्याचा सल्ला दिला. दोन व्यक्ती कधीच एकमेकांसारख्या नसतात. प्रत्येक व्यक्ती वेगळा आहे. त्यामुळे प्रत्येक जीवाचा आदर करा. यामुळे तुमच्या नात्याला नवे तेज येईल. आणि नात्यातील वाद कमी होण्यास मदत होईल.

तुमच्या जीवनाची तुलना इतरांसोबत करु नका. तुम्ही जे आयुष्य जगत आहात त्यामध्ये आनंदी राहण्याचा प्रयत्न करा यामुळे तुम्हाला त्रास होणार नाही. तुमची स्पर्धा स्वत:शी आहे त्यामुळे प्रत्येक दिवसापेक्षा चांगले वागण्याचा प्रयत्न करा.एकमेकांबद्दल कृतज्ञता दाखवा त्यामुळे तुमच्यात प्रेम वाढू शकेल.

तुमचा जोडीदार प्रत्येक गोष्टीत तुमच्या सोबत असेलच असे नाही त्यामुळे त्यांची जागा समजून घेण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे परस्पर समजूतदारपणा दाखवा. जर तुम्ही कामामध्ये वस्त असाल तर भांडण किंवा वाद करण्यासाठी तुमच्याकडे वेळच नसेल त्यामुळे कामात व्यस्त राहण्याचा प्रयत्न करा. सकारात्मक दृष्टीकोन ठेवून तुम्ही आयुष्यात खूप काही साध्य करु शकता. त्यामुळे तुमच्या जोडीदाराचे विचार कसे आहेत या गोष्टीकडे एकदा लक्ष देणे अतिशय आवश्यक आहे.

RELATED ARTICLES

Most Popular