28.2 C
Ratnagiri
Saturday, August 2, 2025

महावितरण-नगरपालिका चिपळुणात आमने-सामने

महावितरण नगर परिषदेचे २०१० पासून मालमत्ता करस्वरूपात...

रत्नागिरीत भरदिवसा दोन फ्लॅट फोडले…

शहरात भरदिवसा चोरट्यांनी दोन बंद फ्लॅट फोडून...

तळेकांटे-तुरळ मार्गावर खड्ड्यांचा सापळा वाहनचालकांची कसरत

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर तळेकांटे-संगमेश्वर-तुरळ हा प्रवास वाहनचालकांसाठी...
HomeRatnagiriरत्नागिरीच्या सुमेधा बने यांनी तयार केलेल्या फंगल आजारावरच्या औषधाला मिळाले पेटंट

रत्नागिरीच्या सुमेधा बने यांनी तयार केलेल्या फंगल आजारावरच्या औषधाला मिळाले पेटंट

calotropies gigantea म्हणजेच आपल्याकडे आढळणारी रुई ही आयुर्वेदिक वनस्पती होय.

तालुक्यात कुवारबाव येथे राहणाऱ्या व गोविंदराव निकम फार्मसी कॉलेजला प्राध्यापिका असणाऱ्या सुमेधा प्रकाश बने यांनी फंगल आजारावर औषध तयार केल्याने भारत सरकारच्या पेटंट कार्यालयाकडून त्यांना पेटंट प्रदान करण्यात आले. त्यांच्या या कामगिरीमुळे त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. अध्यापनाचे कार्य करताना अखेरच्या वर्षात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना सोबत घेत ही कामगिरी त्यांनी केली. calotropies gigantea या औषधी वनस्पतीचा वापर करत त्यावर अभ्यास करीत हे औषध तयार केले. ट्रान्सडर्मल पद्धतीद्वारे हे औषध शरीराला मात्रा करत असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रामुख्याने कॅडिड संसर्ग सामान्य फंगल संसर्ग आहे. तों वेगाने शरीरावर संसर्ग करतो. याचे इन्फेकशन लगेच संपूर्ण शरीरावर पसरतो. यावर तोंडाने औषध पद्धती आहे. त्याचे साईड इफेक्ट सुद्धा आहेत. पण आम्ही अभ्यास करून ट्रान्सडर्मल औषधपद्धती शोधून काढली आहे. मधुमेह, लठ्ठपणा, स्टेरॉईड पद्धती, केमोथेरपी, अँटीबायोटिक, यामुळे हा संसर्ग होतो. शरीराच्या विविध भागात होतो. त्यामुळे ही औषध पद्धती यावर सोयीची ठरेल असा विश्वास सुमेधा बने यांनी व्यक्त केला. calotropies gigantea म्हणजेच आपल्याकडे आढळणारी रुई ही आयुर्वेदिक वनस्पती होय. तिला विषारी वनस्पती म्हणून देखील ओळखली जाते.

मात्र त्याच्या विविध गुणधर्मचा वापर करत हे औषध तयार करण्यात आले. याचा वापर करून पॅच तयार करण्यात येतात व संसर्ग झालेल्या भागावर लावले असता हा फंगल पूर्ण बरा होतो. याचे साईड इफेक्ट होत नसल्याचा अभ्यास आपण केला असल्याचे सुमेधा बने यांनी सांगत तोंडाद्वारे होणाऱ्या औषध पद्धतीमुळे साईड इफ ‘क्ट होण्याची शक्यता असते. हा प्रोजेक्ट त्यांनी शैक्षणिक वर्ष २०२३ मध्ये पूर्ण केला. हा प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी आदिती डिके, तनुजा मिराशी, प्रणव बाईत, गौरी कदम, साक्षी पाटील या विद्यार्थ्यांचे सहकार्य लाभले. त्याचप्रमाणे प्राध्यापिका अश्विनी पाटील, प्रियांका हंकारे, सुकन्या पाटील यांचे मार्गदर्शन मिळाले. त्याचबरोबर अभिनव फार्मसी कॉलेज येथे प्राध्यापिका असणारी त्यांची बहीण मयुरी बने-शेलार यांचे मार्गदर्शन लाभले.

वडील प्रकाश बने व शिक्षिका असणारी आई प्रज्ञा बने यांचे आपल्याला कायम सहकार्य असते हे सांगायला त्या विसरल्या नाहीत. त्यांच्या या कामगिरीमुळे सह्याद्री शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष व आमदार शेखर निकम, सचिव महेश महाडिक, प्राचार्य, प्राध्यापक, कुटुंबीय, मित्रमैत्रिणी यांनी अभिनंदनाचा वर्षाव केला. या यशाचा आपल्याला खूप आनंद होत असल्याचे सांगत अशाच प्रकारे आपल्याकडे असणाऱ्या विविध वनस्पतीचे संशोधन करून अभ्यास करणार असल्याचे सांगत मेडिकल क्षेत्रात अशाच प्रकारे भरीव कामगिरी करण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे.

RELATED ARTICLES

Most Popular