27.9 C
Ratnagiri
Saturday, August 30, 2025

जनआरोग्य योजनेतील कार्ड बनवा : एम. देवेंदर सिंह

एकत्रित आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना, महात्मा...

आंजर्ले किनाऱ्यावर प्लास्टिकसह काळपट द्रव…

दीड दिवसाच्या गणेश विसर्जनाकरिता परंपरेप्रमाणे ग्रामस्थ आंजर्ले...

‘एमआयडीसी हद्दपार’चे झळकले फलक, वाटदवासीयांचे गणरायाला साकडे

एमआयडीसी हद्दपार करा, असे फलक वाटद पंचक्रोशीतील...
HomeSports.... पण मला संध्याकाळच्या खेळासाठी तयार करा - सूर्यकुमार यादव

…. पण मला संध्याकाळच्या खेळासाठी तयार करा – सूर्यकुमार यादव

ताप असतानाही तो ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या निर्णायक टी-२० सामन्यात उतरला आणि त्याला सामनावीर म्हणूनही गौरविण्यात आले.

विजय मिळवण्यासाठी इच्छाशक्ती असणे आवश्यक आहे.  टीम इंडियाचा स्फोटक फलंदाज सूर्यकुमार यादवने रविवारी हे सिद्ध केले आहे. ताप असतानाही तो ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या निर्णायक टी-२० सामन्यात उतरला आणि त्याला सामनावीर म्हणूनही गौरविण्यात आले. ३२ वर्षीय सूर्यकुमार यादवने १९१.६६ च्या स्ट्राइक रेटने ३६ चेंडूत ६३ धावांची धडाकेबाज खेळी खेळली.

त्याच्या खेळीमुळे टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचे १८७ धावांचे लक्ष्य चार विकेट गमावून पूर्ण केले. विजयानंतर सूर्यकुमारने अक्षर पटेल यांच्याशी चर्चा करताना आपल्या आजाराविषयी सांगितले. या संभाषणाचा व्हिडिओ सोमवारी सोशल मीडियावर पोस्ट केला. यामध्ये सूर्य कुमारने सांगितले की या सामन्यापूर्वी त्याची तब्येत खराब होती आणि त्याला नीट झोपही येत नव्हती.

अक्षरने विचारले कि त्याचे काय झाले? तर सूर्यकुमार यादव म्हणाले- ‘थोडे पोट दुखत होते, त्यानंतर तापही आला होता, पण मला हे देखील माहित होते की हा सामना निर्णायक आहे, म्हणून मी माझ्या डॉक्टर आणि फिजिओला सांगितले की मी अशा आजाराने बसू शकत नाही. मग तुम्ही काहीही करा… काहीही करा, कोणतीही गोळी द्या, काहीही इंजेक्शन द्या, पण मला संध्याकाळच्या खेळासाठी तयार करा. एकदा तुम्ही मैदानावर आलात, जर्सी घाला, मग तुमच्या मनात एक वेगळीच भावना निर्माण होते.

सूर्यकुमार यादव-विराट कोहली ६५ यांच्यात ६३ धावांची खेळी खेळली. दोघांमध्ये ६२ चेंडूत १०४ धावांची भागीदारी झाली. शेवटच्या षटकात ११ धावांची गरज होती. कोहलीने पहिल्या चेंडूवर षटकार मारला आणि पुढच्याच चेंडूवर तो बाद झाला. यानंतर दिनेश कार्तिक आणि हार्दिक पांड्याने भारताला विजय मिळवून दिला.

RELATED ARTICLES

Most Popular