24.7 C
Ratnagiri
Tuesday, October 14, 2025

दहावी, बारावी बोर्ड परीक्षेसाठी राजमार्ग

कोकण व कोल्हापूर विभागीय मंडळाचे अध्यक्ष राजेश...

जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना नोटिसा…

आपापल्या जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्यकेंद्रांकडे दुर्लक्ष केल्याचा ठपका...

पूररेषेतील बांधकामांसाठी अटीत शिथिलता

शहरातील पूररेषेतील बांधकामांसाठी नगरविकास खात्याच्या नियमांमध्ये शिथिलता...
HomeDapoliठाण्यात पकडलेल्या संशयिताला घेणार ताब्यात - नितीन बगाटे

ठाण्यात पकडलेल्या संशयिताला घेणार ताब्यात – नितीन बगाटे

त्या पिशव्यांमध्ये ४.५१ किलो वजनाचे चरस हा अमली पदार्थ सापडला.

रायगड जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यावर सापडलेल्या अमली पदार्थांच्या पाकिटासारखी दापोली आणि मंडणगड येथे सापडलेली पाकिटे आहेत. त्यांच्यावरील रिमार्क एकसारखा आहे. समुद्रातून यापूर्वी वाहून आलेली पाकिटे काहींनी लपवून ठेवून नंतर त्याची विक्री करण्याच्या उद्देशाने ती बाळगली होती. ठाणे पोलिसांनी पकडलेला संशयित देखील दापोलीतील असून, चरस विक्रीसाठी नेताना तो सापडला आहे. त्याला चौकशीसाठी ताब्यात घेणार आहे, अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक नितीन बगाटे यांनी दिली. मंडणगड तालुक्यातील साखरी खाडीकिनारी लपवून ठेवलेल्या अमली पदार्थांच्या ४ पिशव्या जप्त करण्यात दापोली पोलिसांता यश आले आहे. त्या पिशव्यांमध्ये ४.५१ किलो वजनाचे चरस हा अमली पदार्थ सापडला. दापोली पोलिसांनी १५ तारखेला केळशी येथील मोहल्ल्यात अब्रार डायलो या संशयिताकडून ९९८ ग्रॅम चरस जप्त केला आहे. त्याच्याकडून सुमारे चार लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला होता.

याप्रकरणी अनारवर अमली पदार्थविरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.  त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा कसून तपास सुरू केला आहे. चौकशीत अब्रारने केळशी किनाऱ्यावर सापडलेल्या पिशव्यांपैकी तीन पिशव्या त्याने स्वतःकडे ठेवल्या आणि चार पिशव्या अखिल होडेकर याच्याकडे दिल्याचे पोलिसांना सांगितले. त्यानंतर पोलिसांनी अखिल होडेकर याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता उर्वरित चार पिशव्या साखरी खाडीकिनारी कांदळवनात लपवून ठेवल्याची माहिती मिळाली. त्यावरून शनिवारी (ता. २०) कांदळवनात शोध घेऊन तिथे ४ पिशव्या सापडल्या. त्याचा पंचनामा करून त्या पोलिसांनी जप्त केल्या आहेत. या कारवाईत आतापर्यंत एकूण २२ लाख ९२ हजार ४०० रुपयांचे चरस दापोली पोलिसांनी जप्त केले आहेत.

यादरम्यान, चरस या अमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या दापोली येथील मसुद बद्रुद्दीन ऐनरकर (वय २९) याला ठाणे पोलिसांनी सापळा रचून अटक केली. त्याच्याकडे सुमारे १ किलो १०६ ग्रॅम वजनाचा चरस व इतर वस्तू असा एकूण १ कोटी १० लाखांचा मुद्देमाल आढळला असून, तो जप्त केला आहे. या गुन्ह्यात आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ तस्करीचे रॅकेट कार्यरत असण्याची दाट शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. त्यामुळे चौकशीसाठी ठाणे पोलिसांकडून मसुद ऐनरकर याला ताब्यात घेतले जाईल, असे अधीक्षक बगाटे यांनी सांगितले.

RELATED ARTICLES

Most Popular