26.5 C
Ratnagiri
Saturday, July 5, 2025

विजयदुर्ग’ वर पूल बांधून दोन जिल्हे जोडा…

तालुक्यातील कुंभवडे व सिंधुदुर्गच्या देवगड तालुक्यातील पाळेकरवाडी...

दाभोळ बंदराचा विकास करा – आ. शेखर निकम

दाभोळ ते पेढे हा जलमार्ग क्र. २८...

मोकाट गुरांचा दिवसाचा खर्च १० हजार – पालिकेला भुर्दंड

शहरातील मोकाट गुरांना पकडण्याची मोहीम पालिकेने हाती...
HomeRatnagiriउपग्रह ट्रान्समिटरमध्ये बिघाडामुळे, प्रथमा कासव आऊट ऑफ सिग्नल

उपग्रह ट्रान्समिटरमध्ये बिघाडामुळे, प्रथमा कासव आऊट ऑफ सिग्नल

२५ जानेवारी २०२२ ला वेळास समुद्रकिनारी टॅग केलेल्या प्रथमा कासवाचा सिग्नल आता मिळेनासा झाला आहे.

जानेवारी २०२२ मध्ये वेळास समुद्रकिनारी अंडी घालण्यासाठी येणाऱ्‍या ऑलिव्ह रिडले कासवांचा प्रवास उलगडण्यासाठी टॅग केलेल्या ”प्रथमा” कासवाचा आता सिग्नल मिळण बंद झाले आहे. उपग्रह ट्रान्समिटरमध्ये बिघाड झाल्यामुळे प्रसारण थांबले असल्याची शक्यता व्यक्त असल्याचा संशोधकांनीही दुजोरा दिला आहे.

कोकण किनारपट्टीवर अनेक ठिकाणी ऑलिव्ह रिडले जातीची कासवं अंडी घालण्यासाठी येतात. गेल्या काही वर्षांमध्ये त्यांचे कोकण किनार्यावर येऊन अंडी घालण्याचे प्रमाण वाढले आहे. ही कासवं एका किनाऱ्‍यावर अंडी घालून गेली की, त्यांचा पुढील प्रवास कसा होतो, यावर अभ्यास करण्यासाठी संशोधन सुरु आहे. त्यासाठी वनविभागाच्या कांदळवन प्रतिष्ठान मार्फत वेळास येथून पहिले कासव जानेवारी महिन्यात टॅग करून सोडण्यात आले. त्यानंतर आंजर्ले, गुहागर किनाऱ्‍यांवरून अन्य चार कासवांना सॅटेलाइट टॅगिंग करण्यात आले. किनाऱ्‍यावर अंडी घातल्यानंतर त्या कासवांचा पुढील प्रवास सुरू झाला आहे. लक्ष्मी कासवाकडून काही दिवसातच सिग्नल येणे बंद झाले होते. अन्य चारही कासवांचा व्यवस्थित प्रवास सुरू होता.

प्रथमाने आतापर्यंत २७०० कि.मी.चे अंतर कापले आहे. प्रथमाचे शेवटचे स्थान सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुणकेश्वर किनाऱ्‍यापासून ६० कि.मी. अंतरावर दिसून आले होते. कासवांच्या प्रवासाची माहिती दर आठवड्याला दिली जात आहे. या आधी गुजरातच्या सागरी हद्दीत विहार करणारे प्रथमा कासवाचा महाराष्ट्राकडे परतीचा प्रवास सुरू झाला आणि त्यानंतर प्रथमा वेळास समुद्रकिनारी परतली होती.

२५ जानेवारी २०२२ ला वेळास समुद्रकिनारी टॅग केलेल्या प्रथमा कासवाचा सिग्नल आता मिळेनासा झाला आहे. उपग्रह ट्रान्समिटरमध्ये बिघाड झाल्यामुळे प्रसारण थांबले असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सिग्नल मिळत नसल्याने प्रथमा कासव नेमके कुठे आहे, हे आता कळत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे पुढील प्रवास थांबलेला आहे.

प्रथमाकडून सिग्नल येणे बंद झाल्यामुळे आता उर्वरित तीन कासवांवर लक्ष केंद्रीत केले जात आहे. त्यातील दोन सिंधुदुर्ग किनाऱ्‍याजवळ आहेत. सावनी आणि रेवा ही दक्षिणेकडे कर्नाटक किनारपट्टीवर आहे. पावसाळ्यामध्ये खाद्य मिळणाऱ्‍या भागात ही कासवं विशिष्ट प्रदेशात वास्तव्य करून राहत असावीत, असा अंदाज बांधला जात आहे.

RELATED ARTICLES

Most Popular