27.1 C
Ratnagiri
Thursday, October 10, 2024

राजापुरात तीन गावांमध्ये वीज पडून नुकसान

ढगांच्या गडगडाटासह रत्नागिरी, राजापूर तालुक्यात परतीच्या पावसाने...

कोकणातील १५ जागा महायुती जिंकेल – मंत्री उदय सामंत

आगामी विधानसभेसाठी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिह्यातल्या किती...

सात औद्योगिक संस्थांना नवी ओळख…

कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या पुढाकारामुळे...
HomeRatnagiriमहामार्ग काळबादेवी समुद्राला समांतर न्या - ग्रामस्थांची मागणी

महामार्ग काळबादेवी समुद्राला समांतर न्या – ग्रामस्थांची मागणी

रामेश्वर मंदिर ते शेट्येवाडीतील घरांना धोका निर्माण होऊ शकतो.

रेवस-रेड्डी सागरी महामार्ग काळबादेवी किनारी भागातून न्यावा आणि मिऱ्या-काळबादेवी पुलाचे काम सुरू करण्यापूर्वी लोकवस्तीच्या सुरक्षेचा विचार आधी करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी शुक्रवारी (ता. १३) झालेल्या बैठकीत केली. प्रकल्पाला विरोध नाही; पण लोकवस्तीला धोका पोचणार नाही, याची काळजी घेण्याची सूचना या वेळी करण्यात आली. ग्रामस्थांच्या सूचना शासनापर्यंत नेण्याची ग्वाही अधिकाऱ्यांनी बैठकीत “दिली. पालकमंत्री उदय सामंत यांनीही काळबादेवी ग्रामपंचायतीत येऊन रेवस-रेड्डी सागरी महामार्गावरील प्प्रस्तावित पूल आणि जोडरस्ता याबाबत ग्रामस्थांना माहिती दिली होती.

हा महामार्ग करताना कोणाचेही घर, मंदिर तुटणार नाही असे सांगितले होते. त्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देऊन ग्रामस्थांशी संवाद साधण्यास सांगितले. त्यानुसार काल महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी काळबादेवी ग्रामपंचायतीत ग्रामस्थांसाठी सादरीकरण दिले. खाडीवरील पूल, नियोजित रस्ता कसा जाणार याची माहिती या वेळी देण्यात आली. गणशोत्सवानिमित्त मुंबईकर चाकरमानी गावी असल्यामुळे बैठकीत उपस्थित केलेल्या तांत्रिक प्रश्नाची उत्तरे देताना अधिकाऱ्यांची तारांबळ उडाली होती. या प्रसंगी हा रस्ता पीर दर्गा येथील धूपप्रतिबंधक बंधारा ते आरे असा समुद्राला समांतर रस्ता न्या, अशी मागणी काळबादेवी ग्रामपंचायतीने सर्वानुमते मांडली.

त्यानंतर ग्रामस्थांच्या सूचना ऐकून घेतल्या. या प्रकल्पाबाबतच्या तक्रारी लेखी स्वरूपात द्या, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. या वेळी ग्रामस्थांनी विकासाला विरोध नाही; परंतु आमची घरे उद्ध्वस्त होणार नाहीत याची खबरदारी शासनाने घेतली पाहिजे, असे सांगितले. संबंधित अधिकाऱ्यांनी रस्त्याचे प्रेझेंटेशन देताना पीर दर्गा ते रामेश्वर मंदिर आणि रामेश्वर मंदिर ते आरे हा रस्ता कोणत्या प्रकारे मार्गस्थ होईल, हे सांगितले; मात्र रामेश्वर मंदिर ते शेट्येवाडीतील घरांना धोका निर्माण होऊ शकतो, अशी भीतीही व्यक्त केली.

RELATED ARTICLES

Most Popular