27.6 C
Ratnagiri
Tuesday, October 14, 2025

सागरी सुरक्षारक्षक यंत्रणा रामभरोसे, मच्छीमारांकडूनही नाराजी

सागरी किनाऱ्याची सुरक्षा ही अत्यंत संवेदनशील आणि...

परताव्याच्या प्रतीक्षेत ३६ हजार ४६८ बागायतदार…

वातावरणातील बदलांमुळे कोकणातील आंबा-काजू बागायतदारांचे होणारे ...

दापोलीत ३५ इलेक्ट्रिक वातानुकूलित बसेस

रस्त्यात बंद पडणाऱ्या जुन्या बसेस, एसीचा अभाव,...
HomeRajapurओबीसी आरक्षण वाचविण्यासाठी वेळप्रसंगी रस्त्यावर उतरुः राजापुरातील बैठकीत निर्धार

ओबीसी आरक्षण वाचविण्यासाठी वेळप्रसंगी रस्त्यावर उतरुः राजापुरातील बैठकीत निर्धार

ओबीसी आरक्षणाबाबतचे ओबीसी बांधवांचे मत शासनाकडे मांडण्याचे मतही त्यांनी यावेळी मांडले.

ओबीसी आरक्षण आमच्या हक्काचे असून त्याला धक्का लागू देणार नाही. ओबीसी आरक्षण वाचविण्यासाठी आंदोलनाच्या माध्यमातून वेळप्रसंगी रस्त्यावर उतरण्याचा निर्धार आज झालेल्या राजापूर तालुका ओबीसी जनमोर्चाच्या बैठकीमध्ये करण्यात आला. ओबीसी आरक्षणासंबंधित लढा हा भावी पिढीच्या भविष्यासाठी असल्याने या लढ्यामध्ये प्रौढ ओबीसी बांधवांसह जास्तीत जास्त युवावर्गाने सहभागी व्हावे असे आवाहन ओबीसी जनमोर्चाचे तालुकाध्यक्ष महेश शिवलकर यांनी केले. शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथील सभागृहामध्ये श्री. शिवलकर यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी झालेल्या या सभेला तालुका सरचिटणीस चंद्रकांत जानस्कर, सौ. अनामिका जाधव, नित्यानंद पाटील, कुणबी समाजाचे नेते प्रकाश मांडवकर, दीपक नागले, अनिल भोवड, प्रकाश कुवळेकर, रवींद्र नागरेकर यांच्यासह अॅड. शशिकांत सुतार, जितेंद्र पाटकर, युवा नेते अभिजीत गुरव, विनय गुरव, विद्याधर राणे, आंबा आडिवरेकर, संतोष हातणकर, मनोहर गुरव, दीपक बेंद्रे, रविकांत भामत, डी.एम. चव्हाण, प्रकाश झोरे, विनोद शेलार, विलास हर्याण, श्रीकांत राघव, भास्कर कुवळेकर, अरविंद लांजेकर, उमेश पराडकर, प्रकाश लोळगे, सुभाष नवाळे, सौ. शीतल पटेल, महेश मणचेकर यांच्यासह ओबीसीमधील विविध संघटनांचे पदाधिकारी, ओबीसी बांधव उपस्थित होते.

सभेच्या सुरूवातीला ओबीसी जनमोर्चाचे तालुकाध्यक्ष महेश शिवलकर यानी सभेच्या आयोजनाचा उद्देश स्पष्ट करताना ओबीसी आरक्षणाबाबत सध्या राज्यामध्ये सुरू असलेल्या घडामोडींविषयी सविस्तर माहिती दिली. ओबीसी आरक्षण वाचविण्यासाठी यामध्ये सर्व ओबीसी बांधवांनी मोठ्या संख्येने कृतीशील सहभागी होणे गरजेचे आहे. त्यामध्ये विशेष करून युवावगनि अधिक सहभागी होण्याचे आवाहन श्री. शिवलकर यांनी केले. यावेळी त्यांनी गावागावामध्ये ओबीसी संघटन होणे गरजेचे असल्याचेही स्पष्ट केले. तेली ज्ञातीतील नेते मारूती खेडस्कर यांनी ओबीसी आरक्षण वाचविण्याच्या लढ्याचे महत्व विषद करताना ग्रामीण भागातील या लढ्याला मुंबईस्थित चाकरमान्यांनी सक्रीय सहभागाचे बळ देण्याची अपेक्षा व्यक्त केली. अॅड. सुतार यांनी ओबीसी आरक्षणातील कायदेशीर बाबी स्पष्ट करताना ओबीसी आरक्षणाचा लढा लढविण्यासाठी यांनी संघटीत व्हावे असे आवाहन केले.

पालकमंत्री ना. उदय सामंत, आ. किरण सामंत यांच्या माध्यमातून ओबीसी आरक्षणाबाबतचे ओबीसी बांधवांचे मत शासनाकडे मांडण्याचे मतही त्यांनी यावेळी मांडले. अभिजीत गुरव यांनी केवळ सभा, बैठका न घेता ओबीसी आरक्षण बचावासाठी आंदोलन करीत थेट रस्त्यावर उतरूया असे आक्रमक मत मांडले. अनिल भोवड यांनी ओबीसी आरक्षणाबाबतची सविस्तर माहिती देताना मुंबई येथे होणाऱ्या आंदोलनामध्ये सर्व ओबीसी बांधवांनी सहभागी होण्याचे आवाहन केले. यावेळी सुरेश बाईत, मधूकर तोरस्कर, शुभांगी सोलगावकर, संतोष हातणकर, संतोष तांबे, प्रकाश झोरे, बलवंत सुतार, डी.एम. चव्हाण आदिंनी ओबीसी संघटन आणि ओबीसी आरक्षण वाचविण्यासाठी लढा यासंबंधित मार्गदर्शन केले.

RELATED ARTICLES

Most Popular