24.3 C
Ratnagiri
Tuesday, October 14, 2025

दहावी, बारावी बोर्ड परीक्षेसाठी राजमार्ग

कोकण व कोल्हापूर विभागीय मंडळाचे अध्यक्ष राजेश...

जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना नोटिसा…

आपापल्या जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्यकेंद्रांकडे दुर्लक्ष केल्याचा ठपका...

पूररेषेतील बांधकामांसाठी अटीत शिथिलता

शहरातील पूररेषेतील बांधकामांसाठी नगरविकास खात्याच्या नियमांमध्ये शिथिलता...
HomeDapoliकेळशीच्या तलाठ्याला लाच घेताना रंगेहाथ पकडले

केळशीच्या तलाठ्याला लाच घेताना रंगेहाथ पकडले

अर्जावर स्वाक्षरी व शेरा देण्याकरीता २० हजारांची लाच स्विकारताना पकडले.

उत्पन्नाच्या दाखल्याच्या अर्जावर स्वाक्षरी व शेरा देण्याकरीता २० हजारांची लाच स्विकारताना केळशी सजाचा अतिरिक्त कार्यभार पाहणाऱ्या मांदिवलीचे ग्राममहसूल अधिकारी (तलाठी) राजेंद्र उंडे यांना लाललुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी दुपारी रंगेहात पकडले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती पत्रकारांना दिली. दरम्यान याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही मंगळवारी सायंकाळी उशीरापर्यंत सुरू होती. उपलब्ध माहितीनुसार तक्रारदार यांच्या उत्पन्नाच्या दाखल्याच्या अर्जावर स्वाक्षरी व शेरा देण्याकरीता ग्राम मेहसूल अधिकारी (तलाठी) राजेद्र उंडे, सजा केळशी अति. पदभार मांदीवली यांनी तक्रारदार यांचेकडे दि.०५/०६/२०२५ रोजी २० हजार रुपयांची मागणी केली होती, असे तक्रारीमध्ये नमूद करण्यात आले आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल होताच सापळा रचण्यात आला.

मंगळवारी १० जून रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास ग्राम महसूल अधिकारी राजेंद्र उंडे याला पंचासमक्ष रक्कम स्विकारताना पकडण्यात आले. सापळा अधिकारी मच्छिंद्र जाधव, पोलीस निरीक्षक लाप्रवि रत्नागिरी यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. या पथकामध्ये सहाय्यक फौजदार चांदणे, पोहवा संजय वाघाटे, पो. हवा. विशाल नलावडे, म. पो हवा. श्रेया विचारे, पो. हवा. दीपक आंबेकर, पो कॉ. हेमंत पवार, पो. कॉ. राजेश गावकर, म पो. कॉ. समिता क्षीरसागर, चालक पो. ना. प्रशांत कांबळे यांचा सहभाग होता.

RELATED ARTICLES

Most Popular