27.3 C
Ratnagiri
Saturday, August 30, 2025

जनआरोग्य योजनेतील कार्ड बनवा : एम. देवेंदर सिंह

एकत्रित आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना, महात्मा...

आंजर्ले किनाऱ्यावर प्लास्टिकसह काळपट द्रव…

दीड दिवसाच्या गणेश विसर्जनाकरिता परंपरेप्रमाणे ग्रामस्थ आंजर्ले...

‘एमआयडीसी हद्दपार’चे झळकले फलक, वाटदवासीयांचे गणरायाला साकडे

एमआयडीसी हद्दपार करा, असे फलक वाटद पंचक्रोशीतील...
HomeRatnagiriबाळ मानेंना न्याय देण्यासाठी फडणवीसांशी बोललो : सामंत

बाळ मानेंना न्याय देण्यासाठी फडणवीसांशी बोललो : सामंत

गैरसमज माझ्याबाबतीत असतील तर ते चर्चा करून दूर होतील.

बाळासाहेबांशी माझे चांगले मित्रत्वाचे संबंध आहेत. बाळासाहेबांना न्याय मिळाला पाहिजे यासाठी मित्र म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोललो आहोत. भाजप कार्यालयात पार पडलेली बैठक ही माझ्यासाठी नव्हती. त्या बैठकीत माझे कुठेही नाव घेतले गेलेले नाही. गैरसमज माझ्याबाबतीत असतील तर ते चर्चा करून दूर होतील, असे प्रतिपादन पालकमंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरीत पत्रकारांपुढे केले. गैरसमजातून काही घडल्यास त्याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटतील, असे सूचक विधानही त्यांनी केले.

माजी आमदार बाळ माने यांनी भाजप कार्यालयात बैठक घेतल्याबाबत मंत्री सामंत यांना पत्रकार परिषदेत विचारले असता ते म्हणाले, ‘आगामी विधानसभेत जिंकायचे असेल तर लोकांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी असतील. त्यामुळे कुणाचेही मनसुबे सफल होणार नाहीत; पण मीच जर टार्गेटवर असेन तर जनता निर्णय घेईल. या बैठकीत माझे कुठेही नाव घेतले गेलेले नाही. गैरसमज माझ्याबाबतीत असतील तर ते चर्चा करून दूर होतील. आपण २००४ मध्ये राष्ट्रवादीतून विजयी झालो, त्यावेळी शिवसेना आपल्यासोबत नव्हती. २००८ मध्येही राष्ट्रवादीतून विजयी झालो, त्यावेळी सेना आपल्या सोबत नव्हती.

२०१३ मध्ये मी शिवसेनेतून लढलो, त्यावेळी थेट लढत झाली. त्यावेळीही उबाठात मला मदत करणारे पदाधिकारी होते आणि आजही आहेत. भाजपच्या ज्या ज्या पदाधिकाऱ्यांनी आपल्याकडे कामे आणली त्यांची कामे आपण केली आहेत. भाजप मित्रपक्ष असून आपण त्यांच्यावर अन्याय केला असे होत नाही. माझे २००४ पासून फडणवीसांशी मैत्रीपूर्ण संबंध असल्याचेही त्यांनी सांगितले.

या वर्षीपासून रतन टाटा उद्योगरत्न पुरस्कार – रत्नागिरीत येऊ घातलेल्या प्रकल्पाविषयी ते म्हणाले, ‘वेल्लोर इन्फोटेकसाठी सध्या दोन हजार कर्मचाऱ्यांची थेट निवड होणार असून, त्यातील दीड हजार हे रत्नागिरीतील असावेत, असे कंपनीच्या संचालकांना सांगितले आहे. काल रतन टाटांचे निधन झाले. मागच्या वर्षी त्यांना आम्ही उद्योगरत्न पुरस्कार दिला होता. यावर्षी पासून रतन टाटा उद्योगरत्न पुरस्कार दिला जाणार आहे, असे सांगितले.

मिऱ्या प्रकल्पाबाबत मानेंशी चर्चा – मिऱ्या येथील प्रकल्पाबाबत बाळासाहेब माने यांच्याशी चर्चा करणार आहोत. त्यानंतर मिऱ्या येथील लोकांशी चर्चा करून त्यानंतरच प्रकल्पाबाबत निर्णय घेतला जाईल. येत्या दोन दिवसांत प्रकल्प करायचा की नाही हे ठरेल, असे पालकमंत्री सामंत यांनी सांगितले.

RELATED ARTICLES

Most Popular