25.7 C
Ratnagiri
Thursday, March 30, 2023

मांडवी एक्स्प्रेस मध्ये सापडल्या घरातून पळालेल्या मुली

घरी जाण्यास उशीर झाल्याने पालक रागावतील या...

रत्नागिरीत शिमग्याच पोस्त आल अंगाशी !

५ हजार रूपये शिमग्याचं पोस्त म्हणून द्या,...

पालशेतच्या समुद्रकिनाऱ्यावर सागरी साहसी खेळांची सुविधा उपलब्ध

नवीन वर्षाचे स्वागत आणि कोकण किनारपट्टी एक...
HomeTechnologyटाटा Tiago EV च्या किंमतीत करणार वाढ

टाटा Tiago EV च्या किंमतीत करणार वाढ

Tiago च्या किमतीत वाढ होण्याची आधीच अपेक्षा होती, कारण कंपनीने ही EV पहिल्या १० हजार ग्राहकांसाठी प्रास्ताविक किंमतीत लॉन्च केली होती

टाटा मोटर्सने आपल्या सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार Tiago EV च्या किमतीत वाढ करण्याची घोषणा केली आहे. नवीन दर जानेवारीपासून लागू होतील. या किमती ३ ते ४ टक्क्यांनी वाढणार आहेत. यामुळे Tiago EV चे सर्व प्रकार ३० ते ३५ हजार रुपयांनी महाग होऊ शकतात. Tiago च्या किमतीत वाढ होण्याची आधीच अपेक्षा होती, कारण कंपनीने ही EV पहिल्या १० हजार ग्राहकांसाठी प्रास्ताविक किंमतीत लॉन्च केली होती. मात्र, लाँचनंतर मिळालेल्या उदंड प्रतिसादानंतर कंपनीने २० हजार ग्राहकांना ही सुविधा दिली होती.

टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेइकल्सचे व्यवस्थापकीय संचालक (एमडी) शैलेश चंद्रा यांनी एका मुलाखतीत सांगितले की, टियागोच्या किमतीतील वाढ केवळ प्रास्ताविक किमतीवर अवलंबून नाही. गेल्या वर्षीच्या तुलनेत बॅटरीच्या किमती ३० ते ३५ टक्क्यांनी महाग झाल्याचं त्यांनी सांगितलं. याशिवाय, एप्रिलपासून लागू होणार्‍या ईव्हीसाठी नवीन बॅटरी नियम आणि बीएस-VI उत्सर्जन मानदंडांमुळे उत्पादन खर्च वाढला आहे. त्यामुळेच ईव्हीची किंमत वाढवली जात आहे.

चंद्रा यांनी सांगितले की, कंपनी या किमती दोन टप्प्यात वाढवणार आहे जेणेकरून ग्राहकांवर थेट परिणाम होणार नाही. चंद्रा म्हणाले की, टियागोच्या सर्व प्रकारांच्या (पेट्रोल आणि सीएनजी) तुलनेत या ईव्हीचे बुकिंग ३० ते ३५% आहे. त्याच वेळी, कंपनीच्या इतर इलेक्ट्रिक वाहनांमध्ये (Nexon EV आणि Tigor EV) टियागो EV ची मागणी २० ते २५% आहे. चंद्रा यांनी माहिती दिली की कंपनी जानेवारीच्या मध्यापर्यंत टियागो ईव्हीची डिलिव्हरी सुरू करण्याची योजना आखत आहे आणि चार ते पाच महिन्यांत पहिल्या बॅचची डिलिव्हरी पूर्ण करण्याची अपेक्षा आहे.

RELATED ARTICLES

Most Popular