22.7 C
Ratnagiri
Sunday, December 22, 2024

मंत्री उदय सामंतांचे उद्या होणार जंगी स्वागत…

मंत्री उदय सामंत यांचे रविवारी (ता. २२)...

गुहागरमध्ये मिडीबसच्या रेडिएटरचा पाईप फुटून २५ जण भाजले

मिडीबसच्या रेडिएटरचा पाईप फुटून रेडिएटरमधील उकळते, हिरवे...

कुंभार्ली घाटरस्त्याचे काँक्रिटीकरण करा – आमदार शेखर निकम

कुंभार्ली घाटमार्गाचे सिमेंट काँक्रिटीकरण, पशुसंवर्धन योजनांसाठी संमतीपत्राची...
HomeRatnagiriकोकण किनारपट्टीवर अलर्ट

कोकण किनारपट्टीवर अलर्ट

दक्षिण-पूर्व अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून त्याचे चक्रीवादळात रूपांतर होणार आहे पुढील चोवीस तासांमध्ये या कमी दाबाच्या पट्ट्याचा वादळामध्ये रूपांतर होणार आहे या वादळाचे नाव तौक्ते (tauktae) ते असं आहे 15 16 आणि 17 तारखेला या वादळाचा प्रभाव दिसेल. कोकण किनारपट्टी रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि गोव्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. याव्यतिरिक्त भारतीय हवामान विभागाच्या वैज्ञानिक शुभांगी भुते यांनी हेही संगितले की 16 आणि 17 तारखेला मुंबई पालघर ठाणे रायगड या जिल्ह्यांमध्ये वादळाचा प्रभाव दिसेल.

चक्रीवादळ तौक्ते (tauktae) हे शनिवार संध्याकाळपर्यंत त्याच भागात असेल त्यानंतर रविवारी 16 मे चक्रीवादळ यांमध्ये तीव्रता येईल यामुळे देशाच्या दक्षिणेकडील भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. चक्रीवादळात वेगाने होणारी वाढ लक्षात घेता भारतीय हवामान खात्याने महाराष्ट्र व गुजरातच्या काही भागात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे या पार्श्वभूमीवर कोकण किनारपट्टीवर अलर्ट जाहीर करण्यात आला आहे 15 मे ते 17 मे किनारपट्टी भागातील लोकांना सतर्क राहण्याचे निर्देश प्रशासनाकडून देण्यात आले आहेत हवामान खात्याने रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथे मुसळधार अति मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविला आहे. मुंबई ठाणे आणि रायगड येथे सोमवारी मुसळधार पाऊस पडेल
हवामान खात्याने सिंधुदुर्ग जिल्ह्याला रविवारी आणि सोमवारी “ऑरेंज अलर्ट” जाहीर केला आहे.

PicCredit : Nitin Sonawane

या काळात येणाऱ्या परिस्थितीसाठी सज्ज राहण्याचे आवाहन हवामान विभागाने केले आहे. जिल्ह्यामध्ये मेघगर्जनेसह तुफानी पाऊस हा या वेळेत होऊ शकतो भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार चक्रीवादळ तौक्ते (tauktae) मध्ये पुढील बारा तासामध्ये बदल संभवतात. सुरुवातीला हे चक्रीवादळ पुढे जाण्याची बरीच शक्यता आहे त्यामुळे आता हे पाहणे गरजेचे ठरेल की आपल्या कोकण किनारपट्टीला किती प्रमाणात चक्रीवादळाचा धोका संभवतो.

चक्रीवादळ घ्यायची काळजी

  • मच्छिमार बांधवांनी शक्यतो समुद्रात जाणे पूर्णपणे टाळावे.
  • स्वतःच्या घरामध्ये शक्यतो रहावे, घराबाहेर पडू नये.
  • आपले घर नादुरुस्त असेल तर सुरक्षित ठिकाणी जाऊन आपली आणि आपल्या कुटुंबीयांची काळजी घ्यावी.
  • पाळीव जनावरांना देखील सुरक्षित ठिकाणी ठेवावे.
  • चुकीच्या अफवा पसरवू नयेत आणि त्या कोणी पसरवत असेल तर शासनाच्या किंवा पोलिसांच्या निदर्शनात आणून द्यावे.
RELATED ARTICLES

Most Popular