26.3 C
Ratnagiri
Saturday, August 2, 2025

महावितरण-नगरपालिका चिपळुणात आमने-सामने

महावितरण नगर परिषदेचे २०१० पासून मालमत्ता करस्वरूपात...

रत्नागिरीत भरदिवसा दोन फ्लॅट फोडले…

शहरात भरदिवसा चोरट्यांनी दोन बंद फ्लॅट फोडून...

तळेकांटे-तुरळ मार्गावर खड्ड्यांचा सापळा वाहनचालकांची कसरत

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर तळेकांटे-संगमेश्वर-तुरळ हा प्रवास वाहनचालकांसाठी...
HomeRatnagiriशिक्षकाच्या वासनाकांडाने रत्नागिरी हादरली आणखी एका शिक्षकाचे 'प्रताप' चव्हाट्यावर

शिक्षकाच्या वासनाकांडाने रत्नागिरी हादरली आणखी एका शिक्षकाचे ‘प्रताप’ चव्हाट्यावर

या शिक्षकाला फासावर लटकवा अशी मागणी जोर धरत आहे.

गुरू-शिष्याच्या नात्याला काळीमा फासत विद्यार्थीनींशी नको ती थेरं करणाऱ्या शिक्षकाचे वासनाकांड उघडकीस येताच साऱ्या रत्नागिरीत संतापाची लाट उसळली असताना त्याच शाळेत आणखी एका शिक्षकाचे ‘प्रताप’ ‘उघडकीस आले आहेत. शाळेतील ३ मुली या शिक्षकाविरोधात तक्रारीसाठी पुढे आल्या असून मंगळवारी या. मुलींच्या पालकांसह काही सामाजिक कार्यकर्त्यांनी शाळेत धाव घेतली. मात्र आपले बिंग आता फुटणार, आपले काही खरे नाही हे लक्षात येताच तो शिक्षक शाळेतून पसार झाल्याची चर्चा सुरू आहे. दरम्यान सोमवारी ज्या प्रथमेश नवेले या शिक्षकाचे प्रताप उघडकीस आले होते त्याच्याविरोधात रत्नागिरी पोलीस स्थानकात पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटकही झाली आहे. न्यायालयाने त्याची रवानगी १७ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत केली आहे.

संतापाची लाट – रत्नागिरीच्या एसटी बसस्थानकासमोरील प्रसिध्द महिला विद्यालयात जे काही घडले ते प्रसारमध्यिमांमधून चव्हाट्यावर येताच साऱ्या रत्नागिरीत मंगळवारी संतापाची लाट उसळली आहे. विद्यार्थीनींशी नको ती थेरं करणाऱ्या या शिक्षकाला फासावर लटकवा अशी मागणी जोर धरत आहे. हे प्रकरण धगधगत असतानाच आणखी एका शिक्षकाविरूध्द काही विद्यार्थीनींनी आपल्या पालकांकडे तक्रार केल्यानंतर मंगळवारी काही पालक, विद्यार्थीनींसमवेत काही सामाजिक कार्यकर्ते शाळेत आले होते.

अश्लील मेसेज ? – या शिक्षकाने मुलींना अश्लील मेसेज पाठविले आहेत आणि त्याची वाच्यता कुठे केली तर तुम्हांला नापास करेन अशी धमकी दिल्याची मुलींची तक्रार आहे. त्याबाबत शहानिशा करण्यासाठी आम्ही शाळेत आलो होतो अशी माहिती सामाजिक कार्यकर्त्या संध्या कोसुंबकर यांनी पत्रकारांना दिली. कोसुंबकर यांच्यासमवेत काही मुलींचे पालकही आले होते. त्यातील काही पालकांनी मेसेज पत्रकारांसमोर वाचून दाखविले.

तू सुंदर दिसतेस…. – ‘तू फार सुंदर दिसतेस, शाळेच्या बाहेर भेटायला ये’ असे हे मेसेज असल्याचे पालकांनी वाचून दाखविले. याची वाच्यता केल्यास तुम्हांला नापास करेन अशी धमकी तो देत होता असाही आरोप आहे. याचा जाब विचारण्यासाठी आम्ही आज शाळेत आलो आहोत मात्र संबंधित शिक्षक शाळेत नाही, तो पसार झाला आहे असेदेखील संध्या कोसुंबकर यांनी पत्रकारांना माहिती देताना सांगितले. शाळेने हा शिक्षक रजेवर असल्याची माहिती आम्हांला दिली आहे असे काही पालकांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

पोलीस कुमक मागविली – सोमवारी घडलेला प्रकार लक्षात घेवून मंगळवारी शाळा प्रशासनाने जिल्हा पोलीस अधिक्षकांशी संपर्क साधत शाळेत पोलीस कुमक मागविली होती. रत्नागिरी शहर पोलीसांचे एक पथक शाळेत तैनात होते. दरम्यान संबंधित शिक्षकाला पालकांनी म ोबाईल नंबर मिळवून कॉल केला आणि ताबडतोब शाळेत या असे सांगितले. तेव्हा त्याने उध्दटपणे तुम्हांला काय करायचे ते करा असे सांगत फोन कट केल्याची माहिती पालकांनी पत्रकारांना दिली. त्यामुळे पालकांच्या संतापाचा पारा चांगलाच चढला होता.

कारवाईचे आश्वासन – शिक्षक शाळेत नसल्यामुळे आलेल्या पालकांच्या तक्रारी शालेय व्यवस्थापन समितीने ऐकून घेतल्या. व्यवस्थापन समिती या तक्रारींची गांभीर्याने दखल घेवून चौकशी करेल आणि योग्य ती कारवाई करेल असे पालकांना सांगण्यात आले. मात्र त्या शिक्षकाला हजर करा अशी मागणी’ पालकांनी लावून धरली आहे. तथापि व्यवस्थापन समितीने चौकशीचे आश्वासन दिले आहे. त्यांना संधी देवूया असे पालकांसोबत आलेल्या काही नागरिकांनी सांगितल्यानंतर पालकांनी ही भूमिका मान्य केली. मात्र कारवाई न झाल्यास महागात पडेल असा इशाराही दिला. कारवाईचे आश्वासन मिळाल्याने आजतरी याबाबत पोलीस स्थानकात तक्रार दाखल झालेली नाही.

संतप्त चर्चा – रत्नागिरीसारख्या सुसंस्कृत शहरात विद्यालयात घडलेल्या अशा प्रकारांमुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असून अशा प्रकारांना जबाबदार असणाऱ्या सर्वांवर कठोर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी होत आहे. साऱ्या रत्नागिरीत संतप्त चर्चा सुरू आहे.

RELATED ARTICLES

Most Popular