28.2 C
Ratnagiri
Monday, June 9, 2025

कोकण मार्गावर तुतारी एक्स्प्रेस चोरट्यांच्या ‘हिटलिस्ट’ वर !

कोकण मार्गावर रेल्वेगाड्यांतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या विशेषतः...

दररोज कचरा द्या, बक्षीस गुण मिळवा, चिपळूण पालिकेचा उपक्रम

शहरातील स्वच्छता आणि घनकचरा संकलन मोहिमेत चिपळूण...

गांजा प्रकरणी आणखी एकाला अटक – महाड कनेक्शन

गांजा विक्री प्रकरणातील मुख्य सूत्रधाराच्या मागावर येथील...
HomeRatnagiriलंपट अधिकाऱ्याला धडा शिकवण्यासाठी शिक्षिका एकवटल्या -  महिला आयोग

लंपट अधिकाऱ्याला धडा शिकवण्यासाठी शिक्षिका एकवटल्या –  महिला आयोग

या प्रकारामुळे आता शिक्षिकांमध्ये देखील भितीचे वातावरण आहे.

महिला शिक्षिकांना त्रास देत मनात लज्जा उत्पन्न होईल असे असभ्य शब्द वापरून लंपटगिरी करणाऱ्या एका अधिकाऱ्याविरोधात पिडीत शिक्षिका एकवटल्या असून बुधवारी रत्नागिरीच्या दौऱ्यावर येणाऱ्या महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्याकडे दाद मागणार आहेत. ‘त्या’ अधिकाऱ्याला पाठीशी घालणाऱ्या बड्या अधिकाऱ्यांचीदेखील तक्रार करण्यात येणार असलयाची चर्चा पंचायत समिती आणि जि. प. वर्तुळासह शिक्षकांमध्येही सुरू आहे. गेले काही दिवस शिक्षण विभागातील एका अधिकाऱ्याने. मोठा हैदोस माजविला असल्याची संतप्त चर्चा सुरू आहे. या अधिकाऱ्याच्या लंपटगिरीला कंटाळलेल्या आणि चिडलेल्या काही शिक्षिकांनी त्याच्या विरोधात प्रशासनाकडे तक्रार देखील केली आहे. एका शिक्षिकेला रोज शाळेत आलिशान गाडीतून सोडायला जाणारा हा अधिकारी चांगलाच उन्मत झाला असल्याची चर्चा सुरू आहे. त्या अधिकाऱ्यामुळे त्याच्यासोबत गाडीतून जाणारी शिक्षिका अधिकच उन्मत झाली आणि सगळा भांडाफोड काही दिवसांपूर्वी झाला. आता हे प्रकरण दाबायचे कसे या विचारात असलेल्या त्या अधिकाऱ्याने शहरानजीक असलेल्या शाळेत जाऊन भांडाफोड करणाऱ्या ‘त्या’ महिला शिक्षिकेला त्रास द्यायला सुरूवात केली. तिच्याशी अश्लील शब्दांत बोलून वारंवार तीच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य कैले अशी चर्चा परिसरात सुरू असून शिक्षिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

बोभाटा झाला – शाळेत जाऊन एका महिला शिक्षिकेला अश्लील शब्दात धारेवर धंरत असभ्य वर्तन करणाऱ्या ‘त्या’ अधिकाऱ्याबाबत एका शिक्षिकेने लेखी तक्रार केली आणि साऱ्या प्रकरणाचा बोभाटा झाला. एवढं होऊन देखील तो अधिकारी उन्मतपणे वागत असल्याची संतप्त चर्चा सुरू आहे.

अधिकाऱ्याची चौकशी पूर्ण – या ‘प्रकरणात जिल्हा परिषदेतील बडया आधिकाऱ्याने ‘त्या’ अधिकाऱ्याची चौकशी लावली होती. या प्रकरणाची चौकशी पूर्ण होऊन अहवाल सादर करण्यात आला. मात्र, प्रशासनाने अद्याप कोणतीही कारवाई केलेली नाही. त्यामुळे ‘त्या’ लंपट अधिकाऱ्याला जिल्हा परिषदेतील काही मंडळी पाठीशी घालत असल्याचा आरोप शिक्षिका करत आहेत.

तक्रारीकडे दुर्लक्ष – घडलेल्या प्रकाराबाबत मुख्याध्यापिकेने जिल्हा परिषदतील दोन वरिष्ठांकडे तक्रार केली होती. अन्यायाचा तपशीलवार पाढा या तक्रार अर्जात वाचूनही संबंधितांनी या तक्रारीकडे दुर्लक्ष केले असा आरोप आता होतो आहे. काही दिवस उलटले तरी त्याकडे गांभिर्याने प्राहिले गेले नाही. असे तक्रारदार शिक्षिकेचे म्हणणे आहे. महिलांनी केलेल्या तक्रारींकडे सुरुवातीला दुर्लक्ष करण्यात आले. त्यानंतर काही सामाजिक संघटनांनी याबाबत याप्रकरणी जोर धरून कारवाईची मागणी केल्यावर ‘त्या’ अधिकाऱ्याची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले होते.

नातेवाईकांकडे मागितली माफी? – चौकशीदरम्यान महिलांनी अधिक गंभीर बाबी समोर आणल्या. यावेळी पिडीत शिक्षिकांचे काही नातेवाईकदेखील उपस्थित होते. चौकशीच्या सुरूवातीला आरोप नाकारणाऱ्या ‘त्या’ अधिकाऱ्याला नातेवाईकांनी चांगलेच फैलावर घेतले. त्यानंतर त्याने चूक कबुल केली. माफीदेखील मागितली असे बोलले जाते. मात्र त्यानंतरही त्याचा उद्दाम पणा सुरूच होता. अखेर त्याला धडा शिकवण्याचा निर्धारच पिडीतांनी केला असून आता या अधिकाऱ्याविरोधात महिला आयोगाकडे दाद मागण्यात येणार आहे.

आणखी एका शिक्षिकेची तक्रार – दरम्यान ‘त्या’ अधिकाऱ्याविरोधात आणखी एका शिक्षिकेने तक्रार केली आहे. तिनेदेखील आपल्याला कसा त्रास देण्यात आला याविषयी तक्रारीम ध्ये सविस्तर नमूद केले आहे. आपल्या जाळ्यात अडकत नसल्याने त्या शिक्षिकेची सहा ते सात वेळा बदली केली असा आरोपदेखील संबंधित शिक्षिकेने तक्रारीमध्ये केला आहे. वादग्रस्त ‘त्या’ अधिकाऱ्याचे कारनामे अजूनही सुरूच असून सायंकाळी ६० वा. नंतर तो विनाकारण कर्मचाऱ्यांना बोलावून घेतो. या प्रकारामुळे आता शिक्षिकांमध्ये देखील भितीचे वातावरण आहे. कारण या अधिकाऱ्याचे कारनामे याआधीच उघड झाले आहेत. हा अधिकारी भलताच पोहोचलेला असल्याने त्याने नवनवीन फंडे अंमलात आणले आहेत. काही दिवसांपूर्वी एका शिक्षिकेचा वाढदिवस त्याने साजरा केला व आपल्या हाताने त्या शिक्षिकेला केक भरवल्याचा फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे.

महिला आयोगाकडे दाद – दरम्यान बुधवारी महिला आयोगाची सुनावणी रत्नागिरीत होणार आहे. त्या वादग्रस्त लंपट अधिकाऱ्याविरोधात पिडित शिक्षिका एकवटल्या असून महिला आयोगात त्याची पुन्हा एकदा तक्रार करणार आहेत. तर काही सामाजिक संघटनादेखील या महिला शिक्षिकांच्यावतीने देखील बाजू मांडणार असल्याचे समजते.

RELATED ARTICLES

Most Popular